प्रतिष्ठा न्यूज

स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमनाचे धडे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत अनोखा उपक्रम

प्रतिष्ठा न्यूज
शिराळा, दि. 2 : शिराळा तालुक्यातील सोनवडे येथील हुतात्मा नानकसिंग माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनोख्या उपक्रमातून वाहतूक नियमनाचे धडे गिरविले. इयत्ता 8 वी ते 12 वी दरम्यानच्या 200 माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी रेजिंग डे संदर्भात मार्गदर्शन करुन आज एका परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. शाळेत झालेल्या या लेखी परिक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेसाहेब लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली उप महासमादेशक अनिल शेजाळे यांनी हा उपक्रम राबवला.

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन (रेझिंग डे) आणि 34 वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत या उपक्रमाचे विशेषत्वाने आयोजन करण्यात आले होते. या परिक्षेसाठी म्हणून विद्यार्थी वाहतूक नियमनाचे धडे गिरवितील आणि त्यांच्या मनातही या विषयाबाबत जागृती होईल, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. त्यासाठी प्राचार्य एस.ए.गायकवाड आणि सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. परिक्षेतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. माध्यमिक गटातून अनुक्रमे कु. संयोगिता संजय नायकवडी, चि.प्रज्वल प्रकाश लोखंडे, कु.वैष्णवी सदाशिव देसाई. तसेच उच्च माध्यमिक गटातून अनुक्रमे चि.ओंकार यशवंत नाईक, चि.प्रेम रवींद्र पाटील, कु.अस्मिता बाबासो शिंदे यांना. पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.