प्रतिष्ठा न्यूज

मुस्लिम दफनभूमीची विक्री केलेली जागा महापालिकेने भूसंपादीत करू नये अन्यथा कोर्टात खेचणार : हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजीज्ञआमदार नितीन शिंदे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली येथील शामराव नगर येथील मुस्लिम व ख्रिश्चन दफनभूमीसाठी आरक्षित असलेली जागा जागा मालकाने *प्लॉट पाडून विक्री केलेली आहे* व विकत घेतलेल्या प्लॉट धारकांनी गुंठेवारी *प्रमाणपत्रासाठी महापालिकेत अर्ज* केले आहेत मूळ जागा मालकांनी बेकायदारीत्या विक्री केलेली जागा महापालिकेने मुस्लिम व ख्रिश्चन समाजाच्या दफन विधीसाठी भूसंपादन करू नये या जागेच्या व्यवहारामध्ये अंदाजे 16 कोटी रुपये किमतीचा घोटाळा होणार आहे या घोटाळ्यामध्ये सहभागी असलेले मुस्लिम समाजाचे नेते काही लोकांना या जागेकडे जाण्यासाठी रस्ता करण्यासंदर्भात पाहणी करतात दुसरीकडे मुस्लिम समाजाच्या मुला मौलविना पाठवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतात मुस्लिम व ख्रिश्चन समाजाला दफन विधीसाठी जागा मिळण्यास आमचा विरोध नाही ही जागा दफनभूमीसाठी योग्य नाही त्याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी या जागेसंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत मुस्लिम व ख्रिश्चन समाजाला चांगली जागा व महानगरपालिकेची लुट न होता मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू पण आमचा विरोध या जागेच्या आडून होणाऱ्या कोट्यावधी रुपयाच्या घोटाळ्या ला आहे तो *पैसा जनतेचा आहे* म्हणून आम्ही या भूसंपादन प्रक्रियेला विरोध करत आहोत तरी महापालिकेने ही वादग्रस्त जागेचे भूसंपादन करू नये अन्यथा *संबंधित अधिकाऱ्यांना कोर्टात* *खेचून* त्यांच्या पगारातून हे पैसे वसूल करू असा इशारा हिंदू एकता आंदोलन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माजी *आमदार नितीन शिंदे* शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव ग्रामीण जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाटील यांनी दिला यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विजय टोने शहर जिल्हाउपाध्यक्ष राजू जाधव शहर अध्यक्ष प्रकाश चव्हाण शहर उपाध्यक्ष संभाजी पाटील खणभाग विभाग अध्यक्ष अवधूत जाधव सांगलवाडी विभागाध्यक्ष अनिरुद्ध कुंभार, मिरज शहर अध्यक्ष सोमनाथ गोठखिंडे, मिरज शहर उपाध्यक्ष राहुल जाधव, ज्येष्ठ पदाधिकारी दत्तात्रय भोकरे, धनंजय खाडीकर,भूषण गुरव, गणपत गायकवाड, नारायण हांडे, बबन मोरे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.