प्रतिष्ठा न्यूज

सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांच्या सहकार्यामुळे शेकडो शिक्षकांना मिळाला न्याय

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड : मागील 15 ते 20 दिवसांपासून जिल्हा परिषद विषय शिक्षकांच्या दर्जन्नतीमध्ये प्रचंड गोंधळ आणि अनागोंदी माजली होती. विषय शिक्षकांच्या पदस्थापनेचा तिढा काही केल्या सुटत नव्हता. विषय शिक्षक दर्जोन्नतीमध्ये अन्याय झालेल्या सर्व शिक्षकांमध्ये प्रशासनाच्या विरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला होता. कोणी लक्ष द्यायला तयार नव्हते.काही ठरावीक शिक्षक बांधवाना पदस्थापना बदलून मिळत होत्या पण सामान्य वाडीतांड्यावरील शिक्षक न्यायाच्या प्रतिक्षेत होते आश्या गंभीर प्रश्नी तथा प्रसंगी म.रा.शिक्षक सेनेच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे यांना भेटून जि.प. प्रशासनाने दजोंनंतीत होत असलेली अनियमितता व शिक्षकावर झालेला अन्याय यावेळी पटवून सांगण्यात आले. आदरणीय सौ आशाताईने ताबडतोब जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल मॅडम यांच्यासोबत सखोल चर्चा करून विषय शिक्षकांना समुपदेशनानुसारच दर्जोनंती मिळणे किती आवश्यक आहे हे पटवून सांगितले . सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे जिल्ह्यातील शेकडो विषय शिक्षकांच्या दर्जोंनंतीचा गंभीर प्रश्न मार्गी लागला व अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळाला त्या बद्दल शिक्षक सेनेच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करुन आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाण, जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, जिल्हा सरचिटणीस रवी बंडेवार सर,जिल्हा उपाध्यक्ष श्री अविनाश चिद्रावार सर,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक काशिनाथ शिरसीकर सर लहू पंदलवाड सर, पत्रकार राजेश पवार सर सह अनेक न्याय मिळालेले शिक्षक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.