प्रतिष्ठा न्यूज

तासगाव दत्तमाळ येथील बाल उद्यानाचे लोकार्पण.. आजपासून शहर वासियांसाठी खुले…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : येथील दत्त माळावर तासगाव नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या बाल उद्यानाचे उद्घाटन आज खासदार संजय काका पाटील,आमदार सुमनताई पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक पृथ्वीराज पाटील,नगर अभियंता आनंदबाबू औताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.येथील दत्त माळावर तासगाव पालिकेच्या वतीने बाल उद्यान व खाऊ गल्ली उभारण्यात आली आहे.तासगाव पालिकेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये मिळालेल्या दोन कोटी रुपये निधीतून हे बाल उद्यान व खाऊ गल्ली उभारण्यात आली आहे.शहरातील लहान मुलांना हे बाल उद्यान म्हणजे एक पर्वणीच असणार आहे.या बाल उद्यानाचे आज उद्घाटन झाले असून,खाऊ गल्लीमधील गाळ्यांचा लिलाव करून पुढील काळात त्याचेही उद्घाटन करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.मागच्या वर्षी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते यां बालोद्यान आणि फूड पार्कचें भूमिपूजन झाले होते.त्यानंतर एक वर्षाच्या आत मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्या पाठपुराव्याने या बाल उद्यानाचे आज उदघाटन होऊन शहर वासियांसाठी तें खुले करण्यात आले आहे.यावेळी पालिकेतील सर्व अधिकारी,कर्मचारी,भाजपा,राष्ट्रवादीचें पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.