प्रतिष्ठा न्यूज

निमणीच्या अक्षदा महादेव निकम हिचीं मंत्रालय लिपिकपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांकडून सत्कार

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : निमणी येथील अक्षदा महादेव निकम हिने नुकत्याच झालेल्या मंत्रालयीन लिपिक परीक्षेत उत्तीर्ण होऊन झाली असून तिची मंत्रालय लिपिक पदी निवड झाली आहे.त्याबद्दल समस्त निमणी ग्रामस्थांतर्फे तिचा सत्कार करण्यात आला.यावेळी गावातील महिलांनी तिचे औक्षण केले.निमणीच्या सरपंच सौ रेखा रविंद्र पाटील यांच्या हस्ते व उपस्थित महिलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी अनिलआप्पा शेळके,राजगोंडा पाटील नेहरूनगर, आर डी पाटील माजी उपसरपंच निमणी,यांनी अक्षदाचे अभिनंदन व कौतुक केले.गावातील तरुणांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून शासकीय नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत माझे कुटुंब,माझ्या मैत्रिणी व ग्रामस्थ यांच्या पाठबळामुळेच मी हे यश संपादन करू शकले अशा भावना  अक्षदा हिने यावेळी व्यक्त केल्या.
अक्षदाची आई सौ.शिवकन्या निकम यांनी भावनावश होत उपस्थितांचे आभार मानले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिनकर पाटील,सोसायटीचे सदस्य भाऊसाहेब ढाणे,विठ्ठल पाटील,निलेश पाटील,नामदेव जमदाडे,विनय सपकाळ,गणपती पाटील,उदय पाटील,सौ.जयश्री शेळके,जयश्री कावरे(मॅडम),खुदीजा मुलाणी,अलका लुगडे,जुलेखा मुलानी,नासीमा शेख,सुरेखा जगदाळे, राणी शेळके,आक्काताई राजमाने,मंगल शेळके,अनुजा शेळके , सुवर्णा शेळके,वर्षा कोळी,नम्रता कावरे, तेजश्री कावरे,ऋतुजा शेळके,शुभम शेळके,अरबाज,अक्षय , बंडू ,अभिमन्यू ,अथर्व,अभिजित, सुरज,यश पाटील,अजित पाटील आदी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.