प्रतिष्ठा न्यूज

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात 5 फेब्रुवारीला “लोकशाही दिना” चे आयोजन

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी न्याय व तत्परतेने सोडविण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी “लोकशाही दिन” आयोजित करण्यात येतो.
त्यानुसार नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने “लोकशाही दिन” दि.5 फेब्रुवारी 2024 रोज सोमवारी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.
या दिवशी महसूल, गृह, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,पाटबंधारे, बांधकाम,परिवहन,सहकार, कृषि विभाग व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी इत्यादी जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येणार आहे. लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.