प्रतिष्ठा न्यूज

मतदान नोंदणी व सर्व शासकीय दाखल्यांचा तरुणांनी लाभ घ्यावा : नायब तहसीलदार सूर्यकांत कापडे

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि राजकीय प्रक्रियेतील सहभागासाठी तरुणांनी पुढाकार घेण्याचे आवाहन नायब तहसीलदार सूर्यकांत कापडे यांनी केले ते आनंदी महाविद्यालय गगनबावडा येथे “युवा संवाद” कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी नायब तहसीलदार महेश देशमुख यांनी सर्व दाखल्यांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची सविस्तर माहिती दिली. महसूल विभागामार्फत उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, 16 टक्के आरक्षण मराठी जातीचा दाखला, डोंगरी दाखला, 33 टक्के आरक्षण दाखला, शेतकरी/ अल्पभूधारक दाखला या व अशा दाखल्यांच्या बाबत सविस्तर माहिती दिली.
अध्यक्ष पदावरून बोलताना प्राचार्य डॉ. टी एम पाटील म्हणाले की, मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी विविध देशात संघर्ष झाले. आपल्याला संविधानाने मतदानाचा अधिकार दिला व सधरुढ लोकशाहीसाठी तरतुदी केल्या त्यातून नव मतदारांनी बोध घ्यावा तसेच शासनाच्या विविध दाखल्यांचा उपयोग करून घ्यावा.
सदर कार्यक्रमासाठी आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन प्रा. सतीश देसाई, सचिव डॉ. सौ .विद्या देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमात प्रा. सुप्रिया घाटगे यांनी मतदानाचे महत्त्व पटवून दिली प्रा. ऐश्वर्या धामोडकर यांनी शासकीय दाखल्यांची सविस्तर माहिती दिली. स्वागत व प्रास्ताविक प्रा. अरुण गावकर यांनी तर सूत्रसंचालन प्रा. शितल मोहिते व आभार प्रा. रोहित सरनोबत यांनी मानले यावेळी उपप्राचार्य डॉ. संदीप पानारी सर्व महाविद्यालयीन प्राध्यापक प्रशासकीय सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.