प्रतिष्ठा न्यूज

तासगाव तालुक्यातील पोलीस भरती झालेल्या युवक युवतींचा युवा नेते प्रभाकरबाबा पाटील यांच्या हस्ते सत्कार* स्पर्धा परीक्षा देणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधासाठी प्रयत्न करणार

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव तालुक्यातील पोलीस भरती झालेल्या युवक युवतीं यांनी जे उज्वल यश संपादन केले आहे,त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाची शान आणि उंची वाढवावी अशी अपेक्षा युवा नेते प्रभाकर (बाबा) पाटील यांनी व्यक्त केली.स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शन केंद्रांना (करिअर अकॅडमी) विद्यार्थ्यांच्या पायाभूत सोयीसुविधांसाठी मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
तासगाव तालुक्यातील स्पर्धा परीक्षाद्वारे नुकतीच महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 40 हून अधिक युवक आणि युवती पोलीस भरतीमध्ये यश संपादन केले आहे.त्यानिमित्त प्रभाकर (बाबा) युवाशक्ती तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ यांच्यावतीने खासदार संजयकाका पाटील यांच्या निवासस्थानी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. पोलीस युवकांचा सत्कार प्रभाकरबाबा पाटील यांनी केला तर पोलीस युवतींचा सत्कार वैजयंता फाउंडेशनचे अध्यक्ष सौ.ज्योतीताई संजयकाका पाटील व सौ.शिवानी प्रभाकरबाबा पाटील यांच्याहस्ते चिंचणी निवासस्थानी करण्यात आला. शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह असे सत्काराचे स्वरूप होते.
 यावेळी तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते प्रभाकर (बाबा) पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील या पोलीस भरतीला पोलीस दलातील एकूण 18 लाख अर्ज आले होते.त्यापैकी 18 हजार पोलीस भरतीस पात्र झाले आहेत. तासगाव तालुक्यातील एकूण 40 हून अधिक युवक आणि युवती पोलीस भरती झाले आहेत ही तासगाव तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पोलीस भरतीसाठी सातत्याने अभ्यास आणि शारीरिक क्षमता सिद्ध करावी लागते.यासाठी रात्रंदिवस कष्ट घ्यावे लागतात हे कष्ट घेतल्यामुळेच आज मोठ्या प्रमाणात तासगाव तालुक्यातील युवक आणि युवती यांची पोलीस भरतीमध्ये नियुक्ती झाली आहे त्यांना भविष्यात त्यांनी तासगाव तालुक्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा प्रभाकर (बाबा) पाटील यांनी व्यक्त केली.यावेळी प्रभाकर(बाबा) पाटील यांनी खासदार संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून खुली व्यायाम शाळा तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशा विद्यार्थ्यांना पायाभूत सोयी सुविधांसाठी आर्थिक मदत देऊ व कोणतीही अडीअडचणी असल्यास थेट संपर्क करावा असे आवाहनही यावेळी केले.यावेळी प्रशिक्षण देणाऱ्या अकॅडमीच्या शिक्षकांनी व नूतन पोलीस भरती झालेल्या युवक आणि युवतींनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की,दिवस-रात्र मैदानी चाचणी तसेच लेखी परीक्षेच्या तयारीसाठी मेहनत करून महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती झालेल्या तासगाव तालुक्यातील युवक युवतींच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून सर्व यशस्वीतांचा सन्मान केल्याबद्दल युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांचे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली,तसेच या आपल्या सन्मानामुळे ग्रामीण भागातील पोलीस भरतीची तयारीसाठी धडपडणाऱ्या अनेक युवक युवतींना निश्चितच प्रेरणा मिळेल व भविष्यात तासगाव तालुक्यातील जास्तीत जास्त युवक व युवतींचा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होतील असा आशावाद आपल्या सत्कारप्रित्यर्थ भावना व्यक्त केल्या.यावेळी ॲम्बेसिअस अकॅडमी तासगावचे हर्ष घाडगे,महेश शेंडगे तसेच इकबाल क्लासेस तासगावचे इकबाल मुलाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यांचाही सन्मान प्रभाकर बाबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
सूत्रसंचालन स्वागत प्रास्ताविक मनोज खराडे यांनी केले.यावेळी सचिन भोसले,गणेश पाटील,राजगोंडा पाटील,प्रदीप पाटील,साहिल एकुंडे,विकास बरगुले,संकेत काळे,गणेश चव्हाण,पोपट वाघमारे तसेच युवक व युवतींचे नातेवाईक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
नेहरूनगरचे भाजप नेते राजगोंडा पाटील म्हणाले की, खासदार संजय काका पाटील यांचे पिताश्री सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक कै.आर के (तात्या) पाटील यांनी महाराष्ट्रात आपल्या पोलिस दलातील कामगिरीने सुवर्ण अक्षराने लिहावी अशी कामगिरी केली होती तोच वारसा खासदार संजय काका पाटील आणि युवानेते प्रभाकर बाबा पाटील आपल्या राजकीय व सामाजिक जीवनामध्ये चालवीत आहेत असा गौरवपूर्ण उल्लेख केला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.