प्रतिष्ठा न्यूज

गव्हाणच्या ठेकेदारास काळ्या यादीत टाका; बांधकाम विभागाचा बिडीओंना तपास अहवाल : मनसेच्या अमोल काळे यांच्या पाठपुराव्यास यश

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : गव्हाण येथील निकृष्ट काम करणाऱ्या व कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाका असा तपासणी अहवाल तासगाव बांधकाम विभागाने गटविकास अधिकारी तासगाव यांना दिला आहे,तसेच त्या कामाची दुरुस्ती करून घेण्यास सांगण्यात आले आहे. याप्रकरणी मनसे नेते अमोल काळे यांनी या प्रकरणाचा सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे.गव्हाण ग्रामपंचायतीत गेल्या ३ ते ४ वर्षात अनेक विकास कामे झाली आहेत.मात्र ती ठेकेदारांनी अतिशय निकृष्ठ पध्दतीने करून शासनाचा निधी लाटला आहे.ही कामे बघितली असता ठेकेदार व अधिकारी पोसण्यासाठीच निधी आला का असा प्रश्न पडतो.यामुळे या विकासकामांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मनसे युवक नेते अमोल काळे यांनी बीडीओ अविनाश मोहिते यांना निवेदनाद्वारे केली होती.मनसेच्या अमोल काळे यांनी बीडीओ यांणा सांगितले होते गव्हाण गावातील जि.प.शाळा समोरील पत्रा शेड,पवार गल्लीत गटारीचे काम,मारूती मंदिर समोरील अंडर ग्राऊंड गटार,विठ्ठल नगर येथील मैदानाचे काम,लक्ष्मी मंदीराजवळील बंदीस्त गटार,वाणी गल्ली पाठीमागील बंदीस्त गटार, मणेराजुरी रोड माळ भाग बंदीस्त गटार, इत्यादी कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे तरी आपण या कामांची स्वतः चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी.
यानंतर तासगाव बांधकाम विभागाने केलेल्या चौकशी अहवालात सांगितले आहे की अंदाजपत्रप्रमाणे पत्रा शेड बांधकाम  पूर्ण झालेले आहे.पवार गल्लीत गटारीचे कामाची पाहणी केली असता दाखविण्यात आलेल्या कामांत त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या त्रुटींची पुर्तता करणेबाबत संबंधित ठेकेदारास सुचना देण्यात आल्या.
शाखा अभियंता एम. एम. कुलकर्णी, ए. एम. निपाणीकर, कनिष्ठ अभियंता, के. एस. पाटील, स्था.अभि.सहा, एस. बी. गायकवाड, स्था.अभि.सहा. यांनी हा अहवाल गटविकास अधिकारी अविनाश मोहिते यांना दिला आहे.व संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची शिफारस केली आहे.या प्रकरणाचा पाठपुरावा मनसे नेते अमोल काळे यांनी केला होता.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.