प्रतिष्ठा न्यूज

नराधम ‘लव्ह जिहादीं’ना फासावर लटकवा : ‘रणरागिणी’ची मागणी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : मुंबईतील हिंदू तरुणी ‘श्रद्धा वालकर’ हीचे 35 तुकडे करून तिची निर्घृणपणे हत्या करणारा नराधम लव्ह-जिहादी आफताब पुनावालाच्या विरोधात देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. हे प्रकरण ताजे असतांना उत्तर प्रदेशातील लखनौ येथेही 19 वर्षीय ‘निधी’ या हिंदू तरुणीने धर्मांतर करण्यास नकार दिल्यामुळे सूफियान या मुसलमान युवकाने तिला चौथ्या मजल्यावरून फेकून तिची निर्दयीपणे हत्या केल्याची दुसरी घटना समोर आली आहे. या केवळ एक-दोन घटना नसून अनेक उदाहरणे यापूर्वीही समोर आलेली आहेत. जिच्यावर प्रेम करतो, त्या व्यक्तीची अशी निघृण हत्या कोणी करणार नाही. त्यामुळे या वासनांध आणि नराधम ‘लव्ह जिहादी’ आफताब पुनावाला आणि सूफीयान यांना तात्काळ फासावर लटकवावे, तसेच हिंदू मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर असा ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीची महिला शाखा ‘रणरागिणी’च्या वतीने मारुती चौक, गावभाग, सांगली येथे आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात आली.

या प्रसंगी ‘रणरागिणी शाखेच्या समन्वयक कु. प्रतिभा तावरे, सौ. विद्या सादुल यांनी मनोगत व्यक्त केले. या आंदोलनसाठी भाजप नगरसेविका सौ. उर्मिला बेलवलकर, बजरंग दलाचे मिरज तालुका संयोजक श्री. आकाश जाधव, तालुका सहसंयोजक श्री. परशुराम नाईक, श्री. संदीप नाईक उपस्थित होते. या वेळी ‘आता अबला नको तू सबला हो, चंडी, दुर्गा, काली हो !’, ‘लव्ह जिहादी नराधम आफताबला फाशी द्या !’, ‘लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करा !’ अशा घोषणाही देण्यात आल्या. सूत्रसंचालन सौ. संपदा पाटणकर यांनी केले.

‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा ! – कु. प्रतिभा तावरे

हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन करणे, त्यांच्याशी ‘निकाह’ करणे, याला नकार दिल्यास बलात्कार करणे, ब्लॅकमेल करणे, हत्या करणे आदी गंभीर प्रकारांची हजारो प्रकरणे यापूर्वी उघड झाली आहेत. आपल्या मुली-बाळींना पळवण्यासाठी हे नराधम आपल्या घरापर्यंत पोहोचले आहेत. आपल्या पोटच्या पोरीचे 35 तुकडे पुन्हा होऊ देणार आहात का? त्यामुळे ‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्यात यावा, यासाठी आम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची लवकरच भेट घेणार असल्याचेही कु. प्रतिभा तावरे यांनी या वेळी सांगितले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.