प्रतिष्ठा न्यूज

डेरला येथील जिल्हा परिषद शाळेत विविध शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत- “कथाकथन” कार्यक्रम संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील डेरला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांचे “कथाकथन” घेण्यात आले. “दप्तराविना शाळा – भिंतीविना वर्ग” या शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इयत्ता चौथीचा विद्यार्थी व्यंकटेश धुमाळे- अध्यक्ष तर प्रमुख पाहुणे म्हणून विष्णू शिंदे हे होते.
यावेळी कु.गायत्री शिंदे -“उंदराला मांजर साक्ष” कु.शरयू राजेगोरे- “भुकेला कावळा” अनिकेत पवार- कोल्हा आणि बगळा, कु.आर्या राजेगोरे “बुडबुड घागरी” कु.सेजल शिंदे- “खरी मैत्री” कु. गायत्री कदम- “हावरा ससा” कु.धनश्री डुबुकवाड- “लबाड लांडगा” आनंदा जाधव- “टोपीवाला आणि माकडे” दुर्गा कदम- “लोभी कुत्रा” अर्णव कदम- “शर्यत” विष्णू शिंदे- “चल रे भोपळ्या” श्रीव्यंकटेश धुमाळे- “लांडगा आला रे आला” यासह अनेक विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला होता.
तसेच शाळेतील उपक्रमशील शिक्षिक मनिषा पवार, ज्योती हंबर्डे, स्वयंपाकी आजी पद्मिनबाई धुमाळे यांनीही पौराणिक, मनोरंजक, अर्थपुर्ण विविध विषयावर सुंदर “कथाकथन” केले.
यावेळी जागतिक अपंग दिनानिमिताने दिव्यांग विद्यार्थी रुद्राक्ष कदम व गणेश शिंदे या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. या उपक्रमाच्या तयारीसाठी वर्ग शिक्षिका अंजली भंडे यांनी मोठे परिश्रम घेतले.
यावेळी राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक पंडितराव पाटील पवळे , शिक्षक- दत्तात्रय पांचाळ, सौ. सनपूरकर मॅडम सह शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.