प्रतिष्ठा न्यूज

तासगाव शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रदीप काका पाटील यांनी अपघात ग्रस्तांना मदतीचा हात दिल्याने गंभीर जखमींना मिळाले जीवदान

प्रतिष्ठा न्यूज/ अनिल शिंदे
सावळज : तासगाव येथे बुधवार दि.२४ रोजी सकाळी ११:३० च्या दरम्यान तासगाव कवठेमहांकाळ महामार्गावर खुजट पेट्रोल पंपासमोर दोन मोटरसायकलचा गंभीर अपघात झाला होता सदरचे अपघातग्रस्त अम्बुलन्सची वाट पहात उभे होते त्याच वेळी शिवसेनेचे तासगाव तालुका प्रमुख हे कामानिमित्त कवठेमहांकाळला निघाले होते त्याच वेळी झालेला अपघात पाहून प्रदीप काका यांनी आपली गाडी थांबवून अपघातातील जखमींची चौकशी करून तात्काळ सदर अपघात ग्रस्त जखमींना आपल्या स्वतःच्या गाडीतून तासगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतू डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सांगलीला पाठविणे आवश्यक असल्याचे सांगितले परंतू रुग्णालयाच्या अंबुलन्सचा ड्रायव्हर हजर नसल्यामुळे गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी दाखल करणे अवघड झाले होते.
प्रदीप काकांनी प्रसंगावधान ओळखून गंभीर जखमींना पुन्हा स्वतःच्या गाडीतून तासगाव येथील जाधव हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
सदरच्या अपघातातील जखमींना केलेल्या मदतीमुळे अपघातातील जखमींना वेळेत उपचार मिळाल्याने जीवदान मिळाले त्यामुळे प्रदिप काका पाटील यांनी दाखवलेली माणुसकी व मदतीचा हात याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.