प्रतिष्ठा न्यूज

तासगाव लक्ष्मीनारायण पतसंस्थेचीं 27 वी सर्व साधारण सभा संपन्न भविष्यात आणखी शाखा विस्तार करण्याचा मानस अध्यक्ष कालगावकर

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : येथील लक्ष्मीनारायण पतसंस्थेची 27 वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जगदीश कालगावकर यांनी यावर्षीही  सभासदांसाठी 15 टक्के लाभांश वाटप करण्यात येत असल्याचे जाहीर केले.विष्णू गल्ली येथील श्री विष्णू मंदिरात अध्यक्ष व संचालकांच्या उपस्थितीत सभा पार पडली.यावेळी संस्थेच्या भविष्यकालीन योजनांची माहिती सभासदांना देण्यात आली. अध्यक्ष कालगावकर यांनी यशस्वी वाटचालीचा आढावा घेऊन,मागील आर्थिक वर्षात संस्थेला जिल्हा  कार्यक्षेत्र मिळाले असून,नवीन दोन शाखा कार्यान्वित झाल्या असून  भविष्यात आणखी शाखा विस्तार करण्याचा मानस यावेळी व्यक्त केला. तसेच मागील आर्थिक वर्षात कर्ज वाटप, कर्ज वसुली, सोनेतारण, ठेव या सर्व बाबतीत संस्थेने उत्तुंग प्रगती केली असून,यासाठी ठेवीदार, हितचिंतक,सभासद,बचत प्रतिनिधींचे सहकार्य लाभले असल्याचे कालगावकर यांनी सांगितले.
 येणाऱ्या काळात संस्थेची सेवा तळागाळातील माणसान पर्यंत पोहोचवणे,सभासदांचें हित जोपासणे,
 सभासदांच्या पैशाची वेळेची बचत करणे, सभासदांना आधुनिक सेवा देणे, यासाठी संस्थेचे प्राधान्य राहील अशी ग्वाही कालगावकर यांनी दिली. यावेळी विषय पत्रिकेचे वाचन सचिव अजित आराध्ये यांनी केले. यावेळी संस्थेच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले रवींद्र देवधर, एडवोकेट चिंतामणी गोसावी,अथर्व जोशी, मुग्धा खरे, ए पी कुलकर्णी डॉक्टर महेश इनामदार,यु जी डफळापुरकर यांचा सत्कार करण्यात आला.संचालक श्रीपाद खरे यांनी स्वागत व प्रस्तावित केले.विक्रम काळे यांनी श्रद्धांजली ठरावाचे वाचन केले. आभार अथर्व जोशी यांनी मानले. यावेळी सूत्रसंचालन एल के जोशी यांनी केले.मुग्धा खरे यांच्या पसायदानाने सभेची सांगता झाली. यावेळी मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.