प्रतिष्ठा न्यूज

नांदेड- वाघाळा महानगर पालिकेत ” मेरी माटी,मेरा देश ” अभियानास उत्साहाने प्रारंभ

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहाने “मेरी माटी, मेरा देश” अभियानास प्रारंभ करण्यात आला आहे.
दि. ९ ते ३० ऑगस्ट दरम्यान “मेरी माटी, मेरा देश ” उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिलाफलक उभारणी, वसुधा वंदन, स्वातंत्र्य सैनिक व विरांना वंदन, पंचप्रण शपथ घेणे, ध्वजारोहण आदी कार्यक्रम घेण्यात आले.

मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत तिसऱ्या माळ्यावर असलेल्या प्रशिक्षण सभागृहात आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षणाधिकारी राजेश पातळे यांनी पंचप्रण शपथ घेणे या उपक्रमातंर्गत हातात / मुठीत माती घेऊन शपथ घेण्यात आली. यावेळी राष्ट्रगीत व महाराष्ट्र राज्य गीत वाचण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे, मुख्यलेखापरिक्षक टी.एल. भिसे, मुख्यलेखाधिकारी डॉ.

जनार्दन पक्वान्ने, सहाय्यक संचालक नगररचना महेंद्र पवार, लेखाधिकारी शोभा मुंडे,, आरोग्य विभागप्रमुख अजितपालसिंह संधु, सहा. आयुक्त गुलाम सादेक, अंतर्गत लेखापिरक्षक सुधीर इंगोले, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी उपस्थितांनी हातात/मुठीत ११ वाजता मुठीत माती घेऊन सेल्फी काढण्यात आली. सुरक्षेसाठी महानगरपालिकेची सर्व क्षेत्रीय कार्यालये, तसेच सं शाळा व दवाखान्यात पंचप्रण शपथ घेण्यात आली. तसेच मनपाच्या अग्निशमन विभागात सैनिकांच क्षेत्रीय अधिकारी रमेश चवरे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
यावेळी पोलीस दलातील व स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारातील आजी/ माजी सैनिकांच्या 238 जणांचा मान्यवरांच्या हस्ते शाल,पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
शहरातील नागरीकांनी या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी नोंदवावा. हातात दिवा / माती घेऊन पंचप्रण शपथ घ्यावी व सेल्फी अपलोड कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.