प्रतिष्ठा न्यूज

सांगलीत शनिवार पासून तीन दिवस ‘नरेंद्र दाभोलकर चित्र शिल्प प्रदर्शन’ ; डॉ. सुनील कुमार लवटे यांचे हस्ते उद्घाटन ; मराठा समाज व अंनिस आयोजक

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी :  ‘मुंबई येथील सुप्रसिद्ध जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले ‘कसोटी विवेकाची नरेंद्र दाभोलकर चित्र शिल्प कला प्रदर्शन’ सांगली येथे शनिवार (दि. २८) तीन दिवस ३० जानेवारी २०२३ पर्यंत मराठा समाज, डॉ. आंबेडकर रोड येथे आयोजित केले आहे .

मराठा समाज सांगली आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगली जिल्हा आयोजित हे प्रदर्शन मुंबईतील पुरोगामी पत्रकारांच्या ‘फ्रेंड्स ऑफ दाभोलकर’ या गटाने आणि परिवर्तन संस्थेने तयार केले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी यावे असे आवाहन अंनिस आणि मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.

*आज उदघाटन*
प्रदर्शनानाचे उद्घाटन आज शनिवार २८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जेष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक उज्वल साठे, आर्कि.प्रमोद चौगुले, व्ही. वाय. (आबा) पाटील, सुभाष (बापू )पाटील असतील, तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ.तारा भवाळकर असतील. कार्यक्रमाचे स्वागत अभिजीत पाटील,(अध्यक्ष, मराठा समाज) हे करतील

हे प्रदर्शन डॉ.नरेद्र दाभोलकरांच्या जीवन परिचय, खून आणि तपास, अंनिस चळवळ, प्रबोधन आणि परिवर्तन या पाच भागांत विभागलं आहे. चित्र, पोर्ट्रेट, एम्बॉसिंग, मेटल वर्क, इंस्टॉलेशन, टेक्सटाईल प्रिंटिंग आणि इचिंग या कलाप्रकाराच्या २६ कलाकृतीतून जे. जे. आर्ट स्कूलच्या युवा कलाकारांनी डॉ. दाभोलकर यांना कलाभिवादन केले आहे.

उदया रविवार दि. २९ जानेवारी रोजी सकाळी ११ ते २ यावेळेत ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावर शालेय विद्यार्थ्याचीं चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे.

प्रदर्शनाचे संयोजन राहुल थोरात, फारुख गवंडी, डॉ. संजय निटवे, गीता ठाकर, डॉ. सविता अक्कोळे,  आशा धनाले, जगदीश काबरे, स्वाती वंजाळे, सुहास यरोडकर करत आहेत.
*प्रदर्शनात काय पहाल?*
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या संक्षिप्त परिचयाने या प्रदर्शनाची सुरुवात होते.  दाभोलकरांच्या कौटुंबिक फोटोंची चित्रे, खून झालेल्या चार विचारवंतांची हुबेहूब पोर्ट्रेस, दाभोलकरांचे तरुणपणापासूनच्या प्रवासाचं पोर्ट्रेट, त्यांचा संपूर्ण जीवनपट उलगडणारा बायोस्कोप, तपासात होणारी दिरंगाई लाल फायलीतून ‘इम्बोसिंग’ कलेच्या माध्यमातून दाखवली आहे. दाभोलकरांच्या सतत सोबत असलेल्या शबनमच्या माध्यमातून ‘अंनिस’च्या प्रवासातील टप्पे, स्मशानसहलीची अनुभूती देणारे इंस्टॉलेशन, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या मुखपृष्ठाचं कोलाज केलेले त्यांचे चित्र, पोर्ट्रेट, एम्बॉसिंग, इंस्टॉलेशन, टेक्सटाईल प्रिंटिंग, इचिंग आदी विभिन्न कलाप्रकार २६ कलाकृतीतून मांडण्याचा प्रयत्न जे.जे.आर्ट स्कूलच्या युवा कलाकारांनी केला आहे.

*प्रदर्शनाचे खास आकर्षण*
डॉ. नरेंद्र दाभोलकर हे उत्कृष्ट कब्बडीपट्टू होते, आंतरराष्ट्रीय पातळीवर ते खेळत असत. कब्बडीतील ‘दाभोलकर उडी’ ही त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे, या ‘दाभोलकर उडीचे’ सुंदर शिल्प युवाकलाकारांनी तयार केले आहे. ते या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.