प्रतिष्ठा न्यूज

शिवार ला तासगाव करांचा उत्स्फूर्त प्रतिसाद… आज शेवटचा दिवस

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगांव येथे आयोजित करण्यात आलेल्या *शिवार* कृषी प्रदर्शनास तासगाव करांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना व क्रांतिसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तासगांव सांगली रोडवरील दत्त मंदिर,दत्तमाळ येथे सलग नवव्या वर्षी महेश खराडे यांनी शेतकऱ्यांचे हित डोळयासमोर ठेऊन शिवार कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
महाराष्ट्रात द्राक्षशेतीचे नाव काढले की आपसूकच लोकांच्या डोळ्यासमोर नाशिक आणि प्रामुख्याने तासगाव तालुक्याचे नाव येते.त्यापैकी तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक परिस्थिती प्रतिकुल असताना देखील केवळ जिद्द,चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर फोंड्यामाळावर देखील हिरव्यागार द्राक्षबागा फुलविल्या आहेत.याच द्राक्षशेतीमुळे तासगांव तालुक्याला आज द्राक्षभूमी अशी ओळख मिळाली आहे.तासगांव तालुक्यातील मणेराजूरी,सावर्डे, सावळज परिसरातील गावांतून मोठ्या प्रमाणात द्राक्षशेती केली जाते. वास्तविक येथील शेतकऱ्यांना द्राक्षशेती करताना मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागते.कधी अवकाळी पाऊस,कधी गारपीट तर कधी दुष्काळाच्या झळा येथील शेतकऱ्यांनी सोसल्या आहेत.तरीही न खचता पुन्हा नव्या जोमाने उभारी घेत येथील शेतकऱ्यांनी हरित क्रांती केली आहे. आज तासगांव तालुक्यात जवळपास २५ हजार एकरांहून अधिक क्षेत्र हे द्राक्ष शेतीचे आहे.तर द्राक्षशेतीवर आधारित विविध खते – औषधांच्या कंपन्या,औषधविक्री दुकाने,ठिबक, पाईप्स इंडस्ट्री,ट्रॅक्टर,ब्लोअर,विविध शेती औजारे निर्मिती व विक्रीची दुकाने,शेतीसाठी आवश्यक प्लास्टिक उत्पादने निर्मिती करणाऱ्या कंपन्या अशा विविध माध्यमातून या तालुक्यातील जवळपास लाखभर लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतो.तसं पाहिलं तर तासगाव तालुक्याची अर्थव्यवस्थाच या द्राक्ष इंडस्ट्रीवर अवलंबून आहे.
आज याच तासगाव मध्ये महेश खराडे यांनी शिवार कृषी प्रदर्शन भरविले आहे.या प्रदर्शनाच्या माध्यमातून या कष्टकरी शेतकऱ्यांच्या पाठिशी राहण्याचा प्रयत्न असून येथील शेतकऱ्यांना द्राक्षशेतीमधील बदलत्या तंत्रज्ञानाची,आधुनिक उपकरणांची,अवजारांची जवळून पाहणी करता यावी,त्यांची शेतीसाठीची उपयोगिता व वापराची माहिती मिळावी तसेच जे शेतकरी द्राक्षशेती क्षेत्रात चांगले व नाविन्यपूर्ण काम करीत आहेत अशा शेतकऱ्यांना  प्रोत्साहित करणे,त्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे.तसेच शासकीय यंत्रणा,कृषी विभाग,बाजार समिती,व्यापारी,उद्योजक, नवउद्योजक,औषधे- खते कंपन्या व त्यांचे विक्रेते,महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी प्लॅटफॉर्म मिळवून देणे. ट्रॅक्टर व अत्याधुनिक फवारणी यंत्रे, जल सिंचन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध कंपन्यांनी विकसित केलेले नवीन तंत्रज्ञान तसेच उत्पादनांची आपल्या शेतकऱ्यांना जवळून ओळख व्हावी,तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वैशिष्टपूर्ण वाणांची तसेच उत्पादनांची माहिती इतर शेतकऱ्यांना व्हावी या उद्देशाने तासगाव नगरीत भव्य अशा शिवार कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये जवळपास 150हुन अधीक कंपन्यांचा सहभाग आहे,शेती व उद्योग विषयक तक्रारी असुविधा यावर योग्य मार्गदर्शन करण्यात येत आहे,आज या कृषी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे समाजातील सर्वच घटकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन महेश खराडे यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.