प्रतिष्ठा न्यूज

राष्ट्रीय छात्र सैनिक महाराष्ट्र ‘महापरिक्रमा’ सायकलिंग जनजागृती अभियानासाठी रवाना

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड दि. 5 : राष्ट्रीय छात्र सेना देशांतर्गत संकट समयी नागरी संरक्षण व नागरी सेवासाठी मोलाचे कार्य करणारी जगातील सर्वात मोठी छात्र संघटना आहे. 26 नोव्हेंबर 1948 ला विशेष कायदा मंजूर करून एनसीसी ची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय छात्र सेनेच्या स्थापनेच्या 75 व्या व आजादीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव व ग्रुप हेडकॉटर अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने महापरिक्रमा मेगा सायकलिंग अभियान संपूर्ण महाराष्ट्रात 2200 किलोमीटरचा प्रवास करून समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी राबविण्यात येत आहे. या महा परिक्रमा सायकलिंग अभियानाची सुरुवात महाराष्ट्रात 24 नोव्हेंबर 2022 रोजी जळगाव येथून झाली आहे. तसेच या अभियानाची सांगता 21 डिसेंबर 2022 डायरेक्टर महाराष्ट्र कार्यालय मुंबई येथे होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही महा परिक्रमा अभियान 2200 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या अभियानांतर्गत महाराष्ट्रातील विविध शाळा, विद्यालय,महाविद्यालय ,ज्युनिअर कॉलेज, निवासी शाळा व इतर सामाजिक ठिकाणी भेट देणार असून पथनाट्य,पोवाडे,नाटके, एकांकिका व इतर विविध सामाजिक उपक्रमाद्वारे समाजामध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, देशप्रेम व विविध सामाजिक समस्यांबद्दल सामाजिक जनजागृती करण्यात येणार आहे.
दिनांक 2 डिसेंबर 2022 रोजी या महापरिक्रमा अभियानाचे नांदेड शहरात आगमन झाले आहे. 52 महाराष्ट्र बटालियन एनसीसी नांदेड च्या वतीने या महापरिक्रमा अभियानाचे स्वागत व संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर दिनांक 4 डिसेंबर 2022 रोजी 52 महाराष्ट्र बटालियन एनसीसी नांदेड चे कमांडिंग ऑफिसर कर्नल रंगाराव यांच्या आदेशानुसार सकाळी 6.45 वाजता या महापरिक्रमा सायकलिंग अभियानाला हिरवा झेंडा दाखवून पुढील प्रवासासाठी व कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी नेताजी सुभाष चंद्र बोस महाविद्यालयाचे एनसीसी अधिकारी डॉ. किशोर इंगळे, श्री शिवराज कदम, श्री प्रताप केंद्रे, श्री भोसीकर, सौ. नवशिंदे मॅडम, तसेच बटालियनचे सुभेदार गोपाल सिंग, सुभेदार वैजनाथ चौगुले, हवालदार यशवीर, जसबीर सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शाळा व महाविद्यालयातील एनसीसी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची देखील उपस्थिती होती.
या महापरिक्रमा अभियानाचे नेतृत्व 11 महाराष्ट्र बटालियन एनसीसी चे कमांडिंग ऑफिसर कर्नल सीपी भदोला करीत आहेत. तसेच 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव लेफ्टनंट कर्नल पवन कुमार विशेष संघटक ची जबाबदारी पार पाडत आहेत. तसेच अधिकारी कॅप्टन डॉ. योगेश बारसे, लेफ्टनंट गौतम भालेराव, लेफ्टनंट शिवराज पाटील व 10 एनसीसी छात्र यांचा सहभाग आहे.
दरम्यान,ही रॅली आज सकाळी नांदेड- परभणी मार्ग रवानगी करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात दर्शन सायकलवर रॅली आहे. विशेषतः एन.सी.सी. महाराष्ट्र डायरेक्टर ची रॅली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.