प्रतिष्ठा न्यूज

चिंचणीच्या विवेक पाटील यांची दुबईच्या इंटरनॅशनल गल्फ एअरवेजमध्ये एअरक्राफ्ट इंजिनीअरपदी निवड

प्रतिष्ठा न्यूज
तासगाव प्रतिनिधी : तालुक्यातील चिंचणी गावचे सुपुत्र विवेक विनायक (शेठ) पाटील यांची इंटरनॅशनल गल्फ एअरवेज दुबई (UAE) यामध्ये
फर्स्ट ऑफिसर (एअरक्राफ्ट इंजिनीअर) या पदावर निवड झाली आहे. सांगली जिल्ह्यातील या पदावर नियुक्ती झालेले विवेक पाटील हे पहिलेच तरूण आहेत.
विवेक पाटील यांचे वडील विनायक पाटील सराफी व्यावसायिक असून कोलकाता येथे व्यवसाय करतात. कोलकाता येथील सेंट थॉमस कॉलेज मध्ये विवेक पाटील यांचे १२ वी पर्यंत शिक्षण झाले. १२ वीत त्यांना ९६ टक्के गुण मिळाले होते. मराठी मुलाने एवढे गुण मिळविल्याने कोलकाता येथील स्थानिक मंत्र्यांनी सत्कार केला होता.
तेथून पुढे ते डोंबिवली येथील ठाकूर इन्स्टिट्यूट ऑफ एव्हीशन टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेतले. एक वर्ष नवी मुंबई एअरपोर्टवर ट्रेनिंग घेतले. त्यानंतर त्यांची इंटरनॅशनल गल्फ एअरवेज दुबई (UAE) यामध्ये फर्स्ट ऑफिसर (एअरक्राफ्ट इंजिनीअर) या पदावर निवड झाली आहे. सांगली जिल्ह्यात पहिल्यांदाच अशी संधी मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.