प्रतिष्ठा न्यूज

चेंबूर कर्नाटका हायस्कूलचा इयत्ता १० वीचा निकाल १०० टक्के

प्रतिष्ठा न्यूज
मुंबई प्रतिनिधी : चेंबूर येथील चेंबूर कर्नाटका हायस्कूलचा इयत्ता १० वी चा, इंग्रजी व कन्नडा माध्यमाचा १०० टक्के निकाल लागला आहे.
इंग्रजी माध्यमातून प्रथम क्र.म्हात्रे तनिष सुजित ९५.४०% हिने पटकावला असून , द्वितीय क्र. राजबर दिव्या जितेंद्र ९२.२०%, तर तृतीय क्र. पातरे विधी जयेश ९०.४०% याला मिळाला आहे.
कन्नडा माध्यमातून प्रथम क्र. मैत्रे प्रिती इरप्पा हिला ७७.४०% गुण प्राप्त झाले असून , द्वितीय क्र. सिडॉल सलोनी हॅशप्पा हिला ७५.४०% गुण मिळाले आसून, तृतीय क्र. शेट्टी चैतन्य मंजुनाथ ७४.६०% गुण मिळाले आहेत.
या वर्षी २६६ विद्यार्थी परीक्षेस समाविष्ट झाले होते, त्यातील ५ विद्यार्थी गुणवंत यादी आले असून ७९ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणी आले आहेत तर १०७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच ६७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीण झाले आहेत, यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष देविदास शेट्टीगर, मुख्याध्यापिका डॉ.गीताजंली सालीयन ,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले. शाळेच्या उज्वल यशाबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.