प्रतिष्ठा न्यूज

वैशाख पौर्णिमेंनिमित्त आडीच्या श्री दत्त देवस्थान मठात प्रवचन संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : जगातील सर्व धर्म संप्रदायांनी मन पवित्र करा हेच सांगितले आहे,मन पवित्र असल्यास जीवन पवित्र होते,मन आणि बुद्धी शुद्ध असल्यास,एकरसता असल्यास जीवनाचे पावित्र्य वाढते,सद्विचारांद्वारे मनाला पावित्र्य लाभते त्यामुळे भवसागरातून मोक्षमहाद्वीपावर जाण्यासाठी सुलभ मार्ग मिळतो,असे प्रातिपादन प.पू.परमात्मराज महाराज यांनी केले.ते आडी (तालुका निपाणी )येथील संजीवनगिरी वरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने वैशाख पौर्णिमेनिमित सर्वेज्य सांस्कृतिक भवनात आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलत होते.यावेळी सकाळी श्री दत्त देवस्थान मठात श्री दत्तगुरुंच्या चरणी अभिषेक अर्पण करून महाआरती करण्यात आली. रात्री साडेसात वाजता नामजपानंतर आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलतांना परमपूज्य परमात्मराज महाराज पुढे म्हणाले,काही लोकांना ज्ञानाचा अभाव असलेल्या गोष्टींविषयी जास्त ओढ असते.जीवनातील गंभीर समस्या सोडविण्यासाठी डिप्लोमॅटिक चॅनेलचा वापर केला जातो.घाण काढण्यासाठी ड्रेनेज चॅनेल द्वारे बाहेर फेकायचे असते. त्याप्रमाणे सद्भाव रूपी चॅनेलद्वारे मोक्षरूपी महाद्वीपावर पोहचू शकता येते.चांगल्या विचारामुळे पवित्रता निर्माण होते.वाईटाचा सहवास,वाईट विचारांच्या आचरणामुळे मनुष्य राक्षस बनत असतो.एक मुलगा नेहमी ध्यान साधना करायचा,एकेदिवशी उन्नत अवस्थेत पोहचलेल्या साधनेमुळे पौर्णिमेचा चंद्र आपल्यात उतरल्याचा तसेच चंद्र शुभ्र असून कोणताही डाग नसल्याचे दिसले,तेव्हा त्यांनी ही गोष्ट आपल्या वडिलांना सांगितली.तेव्हा ही साधनेची शुभचिन्हे असल्याचे त्यांनी मुलग्याला सांगितले.भौतिक चंद्रावर डाग असले तरी मनातील चंद्रावर निष्पाप पवित्रतेमुळे कोणताही डाग दिसत नव्हता.तो मुलगा पुढे महात्मा सोमतन्वि बनला.घराची खोली ज्याप्रमाणे पुन्हा पुन्हा स्वच्छ करावी लागते,त्याप्रमाणे सद्विचाराद्वारे मन व बुद्धीची शुद्धता करीत राहाणे आवश्यक असते.मन चंचल आहे मन बुद्धीचे समत्व साधने महत्वाचे आहे. आजच्या दिवशीच कूर्मावतार झाला तसेच बुद्ध या विभूती संबंधी आजची पौर्णिमा आहे.मन स्वच्छ करा मनाचे पावित्र्य महत्वाचे असल्याचे बुद्ध, महावीर,महंमद पैगंबर,वैदिक धर्मातील विविध आचार्य इ.संत महंतांनी सांगितले आहे.मंदुरराजा राज्याचा पैसा जनतेचा पैसा समजायचा,पगार घेऊन राजपद साभाळायचा.पत्नीने खर्चासाठी दोन महिन्याचा ॲडव्हान्स घेण्या विषयी सांगितले तेव्हा पुढील दोन महिने मी जगेन याची शाश्वती कशी देता येईल असा प्रश्न केला.हा निष्पाप मनाचा पवित्र भाव त्या राजाकडे होता.म्हणून मनाच्या पावित्र्याला महत्व आहे.खरे पावित्र्य शाश्वत सुख देणारे असते. दोघांचे भांडण चालू असले तर ते सोडविण्यासाठी प्रयत्न केला जात नाही उलट व्हीडिओ शुटिंग करून चॅनेल वर सोडण्याचा,व्ह्यूज मिळवियाचा प्रयत्न केला जात असतो.येथे मनाचा पवित्र भाव मुळीच दिसत नाही.केवळ स्वार्थ आहे हाणामारीचे तसेच अश्लील व्हीडिओ पाहून मनाचे पावित्र्य राहणार नाही. नामजप,कोणत्याही धर्माचा पवित्रमंत्र, आयत,वाक्ये,उच्चाराने मन पवित्र होईल अशी भावना सर्व धर्मियांची आहे.पवित्र मंत्र,पवित्र वाक्याच्या उच्चाराने,ऐकल्याने मन पवित्र होते. अशी धारणा सर्व आस्तिकांची आहे. दुर्जनाला चांगले बनवियाचा प्रयत्न करीन म्हणणाऱ्या व्यक्तीला एका राजाने महामंत्री पद देऊ केले. दुसरा वाईट वागत असेल तर त्याला चांगले सुधारण्याची भावना असायला हवी. पवित्रता वाढविण्याची गरज आहे. शत्रुत्व वाढवू नये. ज्या विचारांच्या सान्निध्यात राहता तसे तुमचे मन तयार होते.संप्रदायांध लोक शास्त्राचे आंधळे अर्थ घेतात.माणसाने चांगल्या विचारांमध्ये समरस होऊन साकल्याने चांगल्या विचारांचा ध्यास ठेवावा. जीवनात सत्याला आणि वास्तवाला महत्व आहे.एक वयोवृद्ध महिला मयत झाली,तिची मुले,सुना,नातू, नाती,पणतू,पणती इ.पन्नासभर लोक रडायला लागले.आम्हाला सोडून का गेलीस,आम्हालाही सोबत न्यायला हवे होते,तुझ्याशिवाय आम्ही आता जगून उपयोग नाही असे म्हणू लागले.तेव्हा एक साधू त्यांचे ढोंग ओळखून तेथे आला व म्हणाला सर्वांना नेण्यासाठी यमराज बस घेऊन येत आहेत.तेव्हा ते लोक म्हटले यमराजाला तशी बस आणू देऊ नका ढोंगीपणा उपयोगाचा नाही,मनात आहे ते बाहेर यावे आत बाहेर एकच असावे.मन पवित्र असावे. अशा गुणाला आर्जव गुण म्हणतात. सर्व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य आर्जव गुणधारकाला मिळते.मुल्ला नसरुद्दीनने मरणापूर्वी लिहिलेल्या इच्छापत्राद्वारे जीवन सुरक्षित नाही आणि थडगेही सुरक्षीत नाही.असा सांकेतिक बोध करून शाश्वत सत्य सांगितले.भिंती नसलेले मानव देहरूपी घर आहे हे सुरक्षित नाही. अनंत काळासाठी चांगल्या विचारांचा आश्रय घ्यावा काचेच्या महालातही राजा परिक्षित मरून गेला.अनंत काळासाठी पावित्र्य सुरक्षित राहू शकते.आनंद योग काळी परमार्थ सिद्धी मिळू दे असे सांगितले.यावेळी विनायक सुधाकर आंबले निपाणी यांच्या वतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली होती.वेदिका जोशी कोल्हापूर,प्रकाश बाबूराव जाधव इचलकरंजी,मनोज जाधव पिराचीवाडी आदी मान्यवर भाविक देणगीदार यांचा प.पू .परमात्मराज महाराज व देवीदास महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी अतिशय वादळी पावसाच्या वातावरणातही आडी,बेनाडी, कोगनोळी,हणबरवाडी,हंचिनाळ, सुळकूड,म्हाकवे,आणूर,कागल, निपाणी पंचक्रोशीसह बेळगांव, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, सोलापूर, बीड जिल्ह्यातील कर्नाटक,महाराष्ट्र, गोवा राज्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घेतला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.