प्रतिष्ठा न्यूज

कळंबी येथील सह्याद्री पेट्रोलपंपावरील दरोड्यातील प्रवाशांना लुटणारे ३ आरोपी जेरबंद; मिरज उप विभागातील पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची संयुक्त कारवाई

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : कळंबी ता. मिरज येथील सह्याद्री पेट्रोलपंपावरील दरोडयातील प्रवाशांना लुटणाऱ्या ३ आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. मिरज उप विभागातील पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी ही संयुक्त कारवाई केली.
जेरबंद करण्यात आलेल्या संशयितांची नावे अशी, तरबेज ऊर्फ तबऱ्या चारशिट्या शिंदे, वय २६ वर्षे, रा. खणीजवळ, सिध्देवाडी, ता. मिरज जि. सांगली. २) रणजित अशोक भोसले, वय २५ वर्षे, रा. गोळीबार मैदान वड्डी, ता. मिरज, जि. सांगली. ३) सुरेश रवि भोसले, वय २० वर्षे, रा. आंबेडकर नगर, टाकळी बोलवाड, ता. मिरज, जि. सांगली.

गुन्ह्याची थोडक्यात हकीकत
दि. २४/०५/२०२४ रोजी फिर्यादी नामे चंद्रकांत विठ्ठलराव बावीकाडी हे त्यांचे कुटूबिंयासोबत देवदर्शन करीता कोल्हापुरकडे जात असताना रात्री उशीर झाल्याने पंढरपुर ते रत्नागिरी जाणारे महामार्गाचे शेजारी कळंबी ता. मिरज येथील बंद असलेल्या पेट्रोलपंपावर विश्रांती करण्याकरीता थांबुन झोपले असताना ७ ते ८ इसमांनी येवून शस्त्राचा धाक दाखवून त्यांना जखमी करून त्यांचेजवळील रोख रक्कम, महिलांच्या गळयातील सोने व चांदीचे दागिने लुटून दरोडा घातला होता. सदर बाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाणेस दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखता मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर, मा. पोलीस उप अधीक्षक प्रणिल गिल्डा, मिरज विभाग मिरज यांनी घटनास्थळी भेट देवून सदर गुन्हा उघड करणेबाबत सुचना दिल्या होत्या सदर गुन्ह्यातील आरोपी शोध घेणेकरीता मा. पोलीस उप अधीक्षक प्रणिल गिल्डा, मिरज विभाग, मिरज व पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच मिरज विभागातील पोलीस ठाणेची पथके तयार केली होती.
वरीष्ठांच्या आदेश व निर्देशाप्रमाणे सदर गुन्हयाची उकल करणेकरीता तांत्रिक व गोपनिय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत असता नमुद गुन्ह्यातील आरोपी हे मिळाले माहितीच्या आधारे नमुद गुन्हयातील संशयीत आरोपी तरबेज ऊर्फ तबऱ्या चारशिट्या शिंदे हा सिद्धेवाडी खण येथे असल्याची माहिती मिळाली. नमुद पोलीसांची वेगवेगळी पथके तयार करून माहितीच्या आधारे वरील अटक आरोपी यांना नमुद पथकाच्या मदतीने सापळा रचुन सदर आरोपी ताब्यात घेण्यात आले तसेच त्याचे साथीदार रणजीत अशोक भोसले, रा. वड्डी, आणि सुरेश रवि भोसले, टाकळी बोलवाड यांना वड्डी व टाकळी येथे सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचेकडे नमुद गुन्ह्याच्या अनुशंगाने कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा हा त्यांचे इतर साथीदार यांचे मदतीने केला असल्याची कबुली दिली आहे.
सदर गुन्ह्यात वरील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून मा. न्यायालयात हजर केले असता मा न्यायालयाने सदर आरोपींना ४ दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. १) तरबेजऊर्फ तबऱ्या चारशिटया शिंदे, २) रणजीत अशोक भोसले, ३) सुरेश रवि भोसले हे रेकार्डवरील आरोपी असून यापुर्वी त्यांचेवर चोरी, घरफोडी चोरी तसेच दरोडयाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांचेकडून सांगली तसेच इतर जिल्हयातील मालमत्तेचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मिरज ग्रामीण पोलीस ठाणेचे सहा पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा हे करीत आहेत.

*कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार*
पोलीस उप अधीक्षक प्रणील गिल्डा, मिरज विभाग, मिरज पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील, पोहेकॉ / संजय कांबळे, बिरोबा नरळे, संदीप गुरव, दरिबा बंडगर, अमोल ऐदाळे, संकेत मगदूम, सागर लवटे, अमर नरळे, पोना / संदीप नलावडे, उदयसिंह माळी, स्था.गु.अ.शाखा.
पोलीस निरीक्षक भैरू तळेकर, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे सहा. पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे, पोलीस उप निरीक्षक रविंद्र भापकर, पोहेकों / हेमंत ओबासे, शशीकांत जाधव, विकास भोसले, पोकॉ/ प्रदीप कुंभार, सचिन मोरे, वसंत कांबळे, सुनिल देशमुख, सुहास कुंभार, अफसना मुलांनी, शबाना निकम, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे.
सहा. पोलीस निरीक्षक विक्रम पाटील, पोहेकों / वैभव पाटील, पोकों/ दिपक परीट, दत्तात्रय फडतरे, मिरज शहर पोलीस ठाणे. पोलीस उप निरीक्षक संदीप गुरव, पोकों/ बसवराज कुंदगोळ, विनोद चव्हाण, हनुमंत कोळेकर, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे.
पोशि. कॅप्टन गुंडवाडे, सायबर पोलीस ठाणे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.