प्रतिष्ठा न्यूज

पोलीस असल्याची बतावणी करून वयोवृद्ध इसमाचे सोने चोरी करणाऱ्या आरोपीस अटक १,००,४००/- रु. चे सोन्याचे दागिने हस्तगत

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : पोलीस असल्याची बतावणी करून वयोवृद्ध इसमाचे सोने चोरी करणाऱ्या आरोपीस अटक १,००,४००/- रु. चे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. अबुतालीफ मुसा ईराणी, वय २८ वर्षे, रा. किर्लोस्करवाडी, ता. पलूस, जि. सांगली. असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी ही कारवाई केली.
आण्णासो सिताराम गायकवाड, रा. गायकवाड गल्ली, आरग. ता. मिरज यांनी याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिस अधीक्षक बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोउनि. कुमार पाटील पोहेकॉ/ बिरोबा नरळे, सागर लवटे, नागेश खरात, संदिप गुरव, मच्छिद्र बर्डे, अमर नरळे, पोना/ अनिल कोळेकर, सागर टिंगरे, संदीप नलावडे, उदय माळी, पोशि / विक्रम खोत यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
याबाबत माहिती अशी, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करून, मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन पोलीस असल्याची बतावणी करून तोतयेगिरी करून गुन्ह करणाऱ्या संशयीत इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.

त्या अनुशंगाने दि. १८/११/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार यांचे पथकातील पोहेकॉ. सागर लवटे यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी १०० फुटी रोड चिन्मय पार्क, कुपवाड परिसरात चोरीचे दागिने विक्री करण्याकरीता येणार आहे.

नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे १०० फुटी रोड, चिन्मय पार्क परिसरात निगराणी करत असताना, एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसला. त्यांचा बातमीप्रमाणे संशय आलेने सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार व पथकाने सदर इसमाला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारता त्यांने त्याचे नाव अबुतालीफ मुसा ईराणी, वय २८ वर्षे, रा. किर्लोस्करवाडी, ता. पलूस, जि. सांगली असे असल्याचे सांगितले. सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे पॅन्टच्या खिशात रुमालात सोन्याची चैन व अंगठी गुडांळलेली मिळून आली. सदर मिळाले दागिन्याबाबत विचारणा केली असता, त्याने प्रथमतः उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्याचा सपोनि पंकज पवार यांनी त्यास विश्वासात घेवून विचारले असता त्याने सांगितले की, एक महिन्यापुर्वी आरग ता. मिरज येथील रेल्वे स्टेशन रोडवर एका वयोवृद्ध इसमास तो स्वतः पोलीस असल्याची बतावणी करून त्याचे अंगावरील सोन्याचे दागिने हातचलाखी करून काढून घेतले असल्याची कबूली दिली.

सदरमिळाले मुद्देमालाबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख पडताळला असता, सदर वर्णनाचा सोन्याच्या दागिन्याची फसवणूक केलेबाबत गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्यांचे कब्जातील मुद्देमाल पुढील तपासकामी सहापोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केल्या.

सदर आरोपीव जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले असुन, पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.