प्रतिष्ठा न्यूज

महावितरणच्या गलथान कारभारामुळे कुंडलच्या शेतकऱ्यांचे ऊस पेटले ; महावितरण ची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही : ॲड दिपक लाड

प्रतिष्ठा न्यूज
कुंडल प्रतिनिधी : रविवार दिनांक १३ नोव्हेंबर दुपारी १२ वाजता क्रांती साखर कारखाना पाठीमागील लाड,शिंदे,जाधव
भावकी मधील १० एकर चे वरील उस क्षेत्रातील शेतकऱ्यांचे ऊस पीक, ठिबक सिंचन, पी.व्ही.सी पाईप महावितरणच्या गलथान कारभारामुळे जळून खाक झाले.

मुळात उस पिकाच्या शेतीवरून सर्वत्र महावितरण कंपनीच्या वीज वाहक तारा गेलेल्या असतात, महावितरण ला वेळोवेळी निवेदन व सूचना करून सुद्धा *वीज वाहक विद्युत तारांचा ऊस पिकाच्या लगत अगदी हाताच्या अंतरावर वीज वाहक तारांचा झुकलेला झोळ शॉर्टसर्किटने ऊस जळीत होण्यास निमंत्रण देत आहे.*

*सदरील गैर कारभारा मुळे ऊस जळीता सोबत मनुष्यहानी सुद्धा झाल्या आहेत*

हा गैर प्रकार महावितरण कंपनीच्या वारंवार लक्षात आणून देऊन सुद्धा महावितरण कंपनी याकडे सर्रास दुर्लक्ष करीत आहे.

महावितरण कंपनीकडे अपुरा कर्मचारी वर्ग, असल्याने याचा भुर्दंड ऊस शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.

जीवापाड काबाडकष्ट करून, पोटच्या मुलाप्रमणे ऊस शेती पिकवली जाते, वर्षभर प्रचंड मोठा खर्च ऊस पिकावर शेतकरी करत असतो.साखर कारखान्याला ऊस गाळप करून यामधून मिळणाऱ्या तुटपुंज्या आर्थिक मोबदल्यावर  शेतकऱ्यांना वर्षभर कुटुंब
व शेती खर्चासाठी तारेवरची कसरत करावी लागत असते.

शेतकऱ्यांना ऊस जळीत नुकसानीमुळे मिळणाऱ्या फायद्यामध्ये प्रचंड मोठी कमालीची घट होते.

यामुळे शेतकऱ्यांच्या हातात दीड दमडी सुद्धा उरत नाही..

अशा उस जळीत शेतकऱ्याना वाली कोण…

*शेतकऱ्यांच्या नरडीचा घोट घेण्याचे महापाप महावितरण कडून सर्रासपणे होत आहे.*

ऊस जळीत झालेल्या शेतकऱ्यांचा ऊस नोंद असणाऱ्या साखर कारखान्यांनी तात्काळ गाळप करण्यासाठी ऊस तोड घालावी.

अन्यथा ऊस वजनामध्ये घट होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानीमध्ये भर पडण्याची मालिकाच सुरू होते, असे ॲड दिपक लाड यांनी कळविले.

आज झालेल्या ऊस जळीत घटनेमध्ये ठिबक सिंचन यंत्र, पी.व्ही.सी पाईप संच, शेत बांधावरील फळझाडे, जनावरांचा ओला चारा असे लाखो रुपयांचे अपरिमित नुकसान झाले आहे.

महावितरण व महसूल प्रशासनाने  आज जळीत झालेल्या सर्वच शेतकऱ्यांच्या ऊस क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करावे..
व शेतकऱ्यांना सन्मानजनक भरीव मोठी आर्थिक मदत करावी.

*महावितरण ने व महसूल प्रशासनाने कागदी घोड्यांचा निकष न लावता* आजवर हजारो एकरावरील जळीत क्षेत्र झालेल्या शेतकऱ्यांच्या ऊस जळीत नुकसान भरपाई बाबत महावितरण ने संवेदनशील भूमिका घेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यापेक्षा..

शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू नये याकरिता प्रचंड मोठा मानसिक त्रास व कायदेशीर दमछाक करण्याचा प्रयत्न केला आहे.

अशी भुमिका आज ऊस जळीत झालेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत पुन्हा घडली तर या विरोधात कुंडल सह परिसरातील शेतकऱ्यांचा व महावितरण चा संघर्ष अटळ आहे..

महावितरण कंपनीकडून
तात्काळ उस जळीत झालेल्या शेतकऱ्यांना, व

यापूर्वी हजारो एकरावरील ऊस जळीत झालेल्या शेतकरी आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत शासन दरबारी डोळे लावून वाट बघत बसला आहे अशा शेतकरी बांधवांना तात्काळ मदत द्यावी अन्यथा महावितरणचे विरोधात रस्त्यावरची व कायदेशीर लढाई अटळ आहे असे रणसंग्राम सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष ॲड दिपक लाड यांनी मत व्यक्त केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.