प्रतिष्ठा न्यूज

शिराळा येथील क्लिष्ट खुनाचा गुन्हा उघड; सांगली पोलीसांची कामगिरी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : शिराळा येथील क्लिष्ट खुनाचा गुन्हा उघड झाला असून संशयितांना ताब्यात घेतले आहे. सांगली पोलीसांनी ही कामगिरी केली.
संशयित आरोपी १) देवराज ऊर्फ देव्या चंद्रकांत शेवाळे वय २४ वर्षे व्यवसाय फरशी फिटींग रा. मुळगांव शेवाळेवाडी ता कराड सध्या रा. रुक्मिनीनगर, सुभद्रा सदन बंगला ता. कराड जि. सातारा
२) साक्षी राजेश जाधव (साक्षी विनायक काळुगडे), रा. पलुस, ता. पलुस, जि. सांगली
३) शोभा राजेश जाधव रा. पलुस, ता. पलुस, जि. सांगली
हे आहेत.

*गुन्ह्याची थोडक्यात हकीकत*
दिनांक २०/०५/२०२४ रोजी सकाळी ०९.२० वा पुर्वी नक्की तारीख वेळ माहिती नाही, आय. टी.

आय. कॉलेज ते नाथ मंदिर जाणारे शिराळा बायपास रोडवरील सुरले वस्तीजवळ, श्री. आलय हॉटेलच्या अलीकडे, साकव पुलाचे खाली, पूर्व बाजूस कोणीतरी अज्ञाताने अज्ञात कारणावरून अनोळखी व्यक्तिचा खुन करून त्याचे प्रेत नायलॉनच्या दोरीने गळ्यास व शरीरास बांधून सतरंजीमध्ये गुंडाळून प्रवासी बॅगमध्ये घालून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने वरील ठिकाणी फेकून दिले. सदर मयताचे प्रेत पुर्णपणे सडले असल्याने तो सांगाडा पुरुष जातीचा आहे अगर स्त्री जातीचा आहे, त्याचे वय काय आहे तसेच सदर मयत हा किती दिवसापुर्वी मयत झाला असावा याबाबत निश्चित सांगता येत नाही अशा प्रकारे शिराळा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ मा पोलीस अधीक्षक संदिप घुगे व मा अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर व मा उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. मा पोलीस अधीक्षक संदिप घुगे यांनी मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर विभाग यांच्या नेतृत्वाखाली एकुण पाच तपास पथके तयार करुन त्यांच्यात कामाचे वाटप करुन सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या व मार्गदर्शन केले. सदर गुन्हयामध्ये मानवी हाडांचा सांगाडा मिळुन आलेने मयताची ओळख पटवणे खुपच अवघड होते. सदर मृतदेहाची व त्याचे नातेवाईकांची ओळख पटवणेकरीता व अज्ञात आरोपीचे शोधाकरीता वेगवेगळी पाच तपास पथके तयार करुन रवाना केली होती. तसेच प्रेताचे कवटीवरून तज्ञाकडुन त्याचे रेखाचित्र

तयार केले होते. गुन्हयाचे घटनास्थळी मिळुन आले प्रेत ज्यात ठेवले होते ती प्रवासी बॅग व मयताचे अंगावरील कपडे तसेच जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील मिसींग या आधारे तपास चालु करणेत आला. सदर गुन्हयाचा तपास अतिशय क्लिष्ट व गुंतागुंतीचा होता. तरी देखील तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वरीष्ठांनी वेळोवेळी केले मार्गदर्शनाप्रमाणे अथक परीश्रम घेवुन मुंबई, पुणे, कोल्हापुर, सातारा इत्यादी ठिकाणी प्रवासी बॅगा बनवणाऱ्या कंपनीमध्ये माहिती घेवुन एकुण किती बॅगा तयार केल्या, त्या कोणत्या ठिकाणी विक्री केल्या याबाबतची माहिती गोळा करुन तपास केला असता त्यातील एक बॅग पलुस येथे विक्रीस आली होती अशी माहिती प्राप्त झालेने पलुस येथे जावुन सदर बॅग कोणास विक्री केली आहे याबाबत माहिती घेत असता बॅग विक्रेत्याकडुन बॅग घेणाऱ्याचे प्राप्त वर्णनावरुन रेखाचित्र तयार करुन त्या आधारे तपास सुरु असताना पलुस पोलीस ठाणेस दाखल असले मिसींगमधील व्यक्तीचा शोध घेतेवेळी मिसींग नामे राजेश वसंतराव जाधव वय ५३ वर्षे रा. पलुस, ता. पलुस याचे नातेवाईकांकडे चौकशी करत असता त्यांचे नातेवाईक १) देवराज ऊर्फ देव्या चंद्रकांत शेवाळे वय २४ वर्षे रा. मुळगांव शेवाळेवाडी ता कराड सध्या रा. रुक्मिनीनगर, सुभद्रा सदन बंगला, ता. कराड जि. सातारा २) साक्षी राजेश जाधव रा. पलुस, ता. पलुस जि. सांगली ३) शोभा राजेश जाधव रा. पलुस, ता. पलुस जि. सांगली यांचेकडे केलेल्या चौकशीत विसंगती आढळुन येत असलेने त्यांना विश्वासात घेवुन तपास केला असता, त्यांनी सदरचा गुन्हा केलेची कबुली दिली असुन यातील मयत राजेश वसंतराव जाधव हा दारुचा व्यसनी असुन तो त्याची पत्नी शोभा हिचेवर संशय घेत होता व त्या कारणावरुन तो पत्नी शोभा हिस वरचेवर मारहाण करुन त्रास देता होता त्या कारणावरुन तिन्ही आरोपींनी फेब्रुवारी महिन्यात राजेश वसंतराव जाधव याचा नॉयलॉन दोरीने गळा आवळुन खून करुन त्याचे प्रेत शिराळा पोलीस ठाणे हद्दीत टाकुन दिले होते अशी त्यांनी कबुली दिलेने त्यांना उपरोक्त गुन्हयात अटक करणेत आली आहे.

सदरचे गुन्हयात मृत व्यक्तीबाबत व आरोपींबाबत कोणतीही खात्रीशीर माहिती नसताना पोलीस पथकाने अथक परीश्रम घेवुन मा. पोलीस अधीक्षक संदिप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांचे नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सिध्देश्वर जंगम, पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्था.गु.अ. शाखा, सांगली, स.पो.नि./हरिषचंद्र गावडे, स.पो.नि./प्रविण साळुंखे, स.पो.नि. युवराज सरनोबत, म.स.पो.नि./अनिता मेनकर स.पो.नि. सिकंदर श्रीवर्धन, पो.उप.नि./जयनाथ चव्हाण, पो.उप.नि/ गणेश खराडे, पो.उ.नि. कुमार पाटील सपोफौ / महेश गायकवाड, पोहेकॉ / कालीदास गावडे, पोहेकॉ/नितीन यादव, पोहेकॉ/संदिप पाटील, पोहेकॉ/शरद जाधव, पोना/शरद बावडेकर, पोना/प्रशांत देसाई, पोना/अमर जाधव, पोकों/शशिकांत शिंदे, पोकों/शरद पाटील, पोकों/राहुल पाटील, चापोकॉ/सुनिल पाटील, चापोकों/नागराज मांगले यांनी गुन्हा उघडकीस आणणेस परीश्रम घेतले आहेत. मा पोलीस अधीक्षक, सांगली यांनी वरील तपास पथकास उत्कृष्ट तपास केलेबाबत बक्षीस जाहीर केले आहे.

*कारवाई करणारे अधिकारी आणि अमंलदार*
मा. पोलीस अधीक्षक, संदिप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक, रितु खोखर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगेश चव्हाण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्था. गु. अ. शाखा, सांगली पोलीस निरीक्षक सिध्देश्वर जंगम, शिराळा पोलीस ठाणे

१. स.पो.नि./हरिषचंद्र गावडे, २.स.पो.नि./ प्रविण साळुंखे, ३. स.पो.नि. युवराज सरनोबत, ४.म.स.पो.नि./अनिता मेनकर, ५. स.पो.नि. सिकंदर वर्धन, ६.पो.उप.नि./जयनाथ चव्हाण, ७. पो.उप.नि/ गणेश खराडे, ८. पो.उ.नि.कुमार पाटील ९. सपोफौ / महेश गायकवाड,

१०. चासपोफी/जगदाळे

११. चापोहेको/लुगडे

१२. पोहेकों / कालीदास गावडे

१३. पोहेकों/नितीन यादव,

१४. पोहंकों/सचिन धोतरे

१५. पोहेकों/संदिप पाटील

१६. पोहेकों/शरद जाधव,

१७. पोहेकों/कुबेर खोत

१८. पोहेकॉ/विनय माळी १९. पोहेकॉ/अरूण पाटील

२०. पोना/शरद बावडेकर,

२१. पोना/प्रशांत देसाई, २२. पोना/अमर जाधव, २३. पोना/जितेंद्र थोरात, २४. पोना / संदीप नलावडे, २५. पोना / उदय माळी, २६. पोना/सोमनाथ गुंडे,

२७. पोकॉ/शशिकांत शिंदे,

२८. पोकॉ/शदर पाटील,

२९. पोकॉ/राहुल पाटील,

३०. पोकॉ/तुषार सुर्यवंशी

३१. पोकों/संजय पाटील

३२. पोकॉ/सोमनाथ पतंगे

३३. चापोकॉ/सुनिल पाटील

३४. चापोकों/नागराज मांगल

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.