प्रतिष्ठा न्यूज

जिथं थोरात तिथं कामे जोरात: 50 लाखाच्या कामाचे उद्घाटन : शिवसेना नेते बबनराव थोरात

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड दि.13 : जिथं थोरात तिथं कामे जोरात असे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेते ना.बबनराव थोरात यांनी केले.ते नांदेड शहरा जवळील वाडी बु. येथील विशालनगर ते त्रिमूर्ती नगर सी सी रस्ता मजबुतीकरण,दुरूस्ती कामासाठी 50 लाख रु विकास कामाचे उद्घाटन शिवसेना संपर्क प्रमुख श्री बबनराव थोरात यांचे हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या रस्त्याच्या विकासकामांसाठी महाराष्ट्र राज्य युवा सेना सहसचिव ,युवा नेतृत्व श्री माधवराव पावडे यांनी पुढाकार घेऊन कामे मंजूर केली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी खा.श्री सुभाष वानखेडे जिल्हा शिवसेना प्रमुख श्री दत्ता पाटील कोकाटे ,हिंगोली जिल्हा प्रमुख श्री विनायक पाटील भिसे श्री गोपू पाटील हे उपस्थित होते.
सेना नेते श्री बबनराव थोरात म्हणाले की,सरकार कोणाचेही असो शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करु असे वचन त्यांनी दिले. ते पुढे म्हणाले की. आम्ही त्यांची कामे केली, त्यांना आमची, जनतेची सार्वजनिक विकासासाठी कामे करावी लागतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना माजी खा.सुभाष वानखेडे म्हणाले की, युवा सेना सहसचिव श्री माधव भाऊ पावडे यांनी उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आतापर्यंत 12 कोटी रुपयांची कामे मंजूर करुन पूर्ण केली आहेत. हे शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पाठिंशी जनतेनी ठामपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.


शिवसेना जिल्हा प्रमुख श्री दत्ता पाटील कोकाटे यांनी यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले. शिवसैनिकांना आपण नेहमी मदत करणार आहे. तुम्ही गद्यार लोकाचा विचार करू नका. काही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क साधा असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
याप्रसंगी ना.श्री बबनराव थोरात,माजी खा.सुभाष वानखेडे,जिल्हा शिवसेना प्रमुख श्री दत्ता पाटील कोकाटे, हिंगोली जिल्हा प्रमुख श्री विनायक पाटील भिसे, लोकसभा संघटक डॉ.मनोज भंडारी, सह संपर्क प्रमुख श्री भुजंग पाटील,श्री प्रकाश मारावार ,शहर प्रमुख श्री नेताजी भोसले,श्री सचिन किसवे, बाळासाहेब देशमुख, श्री मुकुंद जवळगावकर, हिंगोली सह संपर्क प्रमुख श्री गोपू पाटील, सरपंच प्रतिनिधी श्री दिपक बुक्तरे ,बंडू छोटा पावडे, श्री विठ्ठलराव पावडे,शिक्षक सेना जिल्हा प्रमुख श्री तानाजी पवार, डॉ.माणिकराव गाडेकर आदीजण उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.