प्रतिष्ठा न्यूज

शिक्षक सेनेकडून कै. रामदास कस्तुरे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट                            
उमरा :  लोहा पंचायत समिती कार्यालयात कार्यरत असलेले “गट साधन व्यक्ती” तसेच सर्वांशी बंधुभाव प्रेमाचे संबंध असलेले कै.रामदास गंगाधर कस्तुरे यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटूंबिया प्रति सहानुभूती म्हणून त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी श्रीमती पदमीनबाई रामदास कस्तुरे यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना व मित्र परिवार यांच्या वतीने दि.5 ऑक्टोबर 2023 रोजी रुपये- 58,437- अठ्ठावन हजार चारशे सदोतीस रुपयांच्या मदतीचा धनादेश कै. रामदास कस्तुरे यांच्या आई, पत्नी व मुलगी यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
या वेळी शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष- विठुभाऊ चव्हाण, जिल्हाध्यक्ष- संतोष अंबुलगेकर, जिल्हा सरचिटणीस- रवी बंडेवार, जिल्हा कोषाध्यक्ष- गंगाधर कदम, जिल्हा सल्लागार- शिवाजी पाटील, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त- प्रविण पाटील, जिल्हाउपाध्यक्ष- गंगाधर ढवळे, मुस्तफा शेख, जिल्हा संघटक- प्रकाश कांबळे, तालूका सल्लागार- लहू पंदलवाड, तालूका प्रसिद्धीप्रमुख- वाय.पी.कुलकर्णी, शिवराज सोनवळे, लोहा तालुकाध्यक्ष- संभाजी पवार, उपाध्यक्ष- मारोती वसमतकर, संतोष घटकार, तालुका संघटक- अंबर फुलसे, तालूका सहसचिव- राहूल बनसोडे, विषय शिक्षक- संजय अकोले, चव्हाण सर, सह शिक्षक सेनेचे अनेक सदस्य उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.