प्रतिष्ठा न्यूज

सेवापूर्तीनिमित्त मुख्याध्यापक प्रकाश वायदंडे यांचा सपत्नीक सत्कार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : शेठ रतिलाल विठ्ठलदास गोसलिया हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रकाशभाऊ वायदंडे हे जून 2024 अखेर निवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा माजी आमदार भगवानराव साळुंखे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. आर्किटेक्ट श्रीराम कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.

यावेळीसंस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र देवधर, शाळा समितीचे अध्यक्ष अ.भा. करंदीकर, संस्थेचे संचालक वि.श्री. कुलकर्णी, केंद्रप्रमुख सौ. ए.जी.भांबुरे, कक्ष अधिकारी उल्हास भांगे, माजी सैनिक भूपाल वायदंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री.प्र.भा.वायदंडे हे 38 वर्षांच्या सलग सेवेनंतर निवृत्त झाले त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी उत्तमराव पाटील, श्री.ग. बा.सपकाळ, बाळासाहेब मोहिते- पाटील, उमेश आवळे, केंद्रप्रमुख अश्विनी भांबोरे त्याचबरोबर माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी गुणगौरवपर मनोगत व्यक्त केले. प्रारंभी शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत व ईशस्तवन सादर केले. सौ. पूर्वा कुलकर्णी यांनी स्वागत प्रास्ताविक केले. प्रीतम जोशी यांनी सूत्रसंचालन केले. सौ. वर्षा वाशिकर यांनी आभार मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.