प्रतिष्ठा न्यूज

केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थीनी इशिता संभाजीराव पाटील हीची राज्यस्तरीय शालेय योगासन स्पर्धेसाठी निवड

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली प्रतिनिधी :  जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,कोल्हापूर यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या विभागीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धेत इशिता संभाजीराव पाटील हिने मुलींच्या 17वर्षाखालील वयोगटात रिदमिक प्रकारात 3रा क्रमांक व ट्रॅडिशनल प्रकारात 4था क्रमांक मिळविला.तिच्या या यशामुळे तिची निवड संगमनेर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धसाठी झाली आहे आपल्या दैनंदिन सरावामध्ये सातत्य ठेवल्यामुळे तिला हे यश संपादन करता आले.

तिच्या या स्पर्धेतील यशाबद्दल तीचे समाजात सर्वत्र कौतुक होत आहे.
तिच्या यशात संस्थेचे चेअरमन मा. पृथ्वीराज पाटील सर, शाळेच्या अधीक्षिका सौ. ख्रिस्तीना मार्टिन मॅडम, प्रशासक मा. रफिक तांबोळी सर, उपमुख्याध्यापिका सौ पद्मा सासनुर मॅडम, समन्वयिका अश्विनी येलकर मॅडम,  क्रीडा शिक्षक चंद्रशेखर कांबळे सर , राजेश कुरणे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.