प्रतिष्ठा न्यूज

तासगावात विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : संपूर्ण देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमीला विविध ठिकाणी पथसंचलन होत असते. त्यानुसार तासगाव शहरात काल सायंकाळी पाच वाजता मोठ्या उत्साहात पथसंचलन संपन्न झाले.यावेळी मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते.शहरातील ठिकठिकाणी स्वयंसेवकांवर आणि भगव्या ध्वजावर पुष्पवृष्टी करून लोकांनी स्वागत केले.चंपाबेन हायस्कूल येथून सुरू झालेले संचलन विविध भागात फिरून पुन्हा चंपाबेन हायस्कूल येथे आले.त्यानंतर शस्त्रपूजन करून ॲड.सौरभ वाटवे यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आयकर सल्लागार नागेश स्वामी, सांगली जिल्हा सहकार्यवाह सुधीर चापोरकर आणि तासगाव तालुका कार्यवाह राजेंद्र माळी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.