प्रतिष्ठा न्यूज

अंकलीत उद्या लिंगायत कुंभार समाजाचा राज्यस्तरीय मेळावा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : श्री लिंगायत कुंभार समाज सेवाभावी संस्था,महाराष्ट्र राज्य यांचे वतीने लिंगायत कुंभार बांधवासाठी राज्यस्तरीय वधुवर मेळाव्याचे आयोजन केले आहे.कुंभार मंगल कार्यालय जैन पाइप समोर सांगली कोल्हापूर रोड,अंकली याठिकाणी उद्या सकाळी 10 वाजले पासून कार्यक्रमास सुरुवात होणार आहे.
या मेळाव्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्रातील लिंगायत कुंभार बांधव मोठया संख्येने उपस्थित राहणार असून,या मेळाव्याचा समाज बांधवानी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.पालकांच्या कामांच्या व्यस्ततेचा विचार करून आणि मुला मुलींचे विवाह करताना येणारे अडथळे दूर व्हावेत,विवाह लवकर तेही योग्य वेळेत आणि योग्य जोडीदारासोबतच जुळावेत,यासाठी  दिवाळीच्या सुट्ट्यांचे निमित्त साधून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.वधु-वर परिचय मेळावा,तसेच प्रत्यक्ष सर्वांची भेट व्हावी यासाठी संबंधित वधु-वर,त्यांच्या पालकांनी आणि समाज बांधवांनी मेळाव्याला येण्याचे आवाहन लिंगायत कुंभार समाज सेवा भावी संस्था अंकली तर्फे करण्यात आले आहे.यावेळी लिंगायत कुंभार समाजातील यशस्वी,हुशार मुलांचा , विविध क्षेत्रात पुरस्कार मिळवलेल्या बांधवांचा मानसन्मान,सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात येणार आहे अंकली हे मध्यवर्ती ठिकाणी असल्याने कर्नाटक,महाराष्ट्र राज्यातून तसेच,पुणे,मुंबई,नाशिक, सातारा,सांगली,मिरज सोलापुर या कोणत्याही ठिकाणाहून येण्यासाठी सोयीचे आहे.हा मेळावा कामगारमंत्री महाराष्ट्र राज्य व सांगली जिल्हा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे व आमदार सुधीर दादा गाडगीळ,उप जिल्हाधिकारी डी एस कुंभार,सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र कुंभार,डॉक्टर उत्तम कुंभार,प्राचार्य राजेंद्र कुंभार,अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.या मेळाव्याचे आयोजन श्री लिंगायत कुंभार समाज सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष किरण कुंभार,कार्याध्यक्ष सोमनाथ कुंभार,संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कुंभार,सर्व संचालक सल्लागार व कार्यकारिणी मंडळ तसेच सर्व समाज बांधव कार्यकर्ते यांनी केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.