प्रतिष्ठा न्यूज

शांताबाई देशमुख यांचे निधन : सभापती- संजय देशमुख लहानकर यांना मातृशोक

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : अर्धापुर तालुक्यातील लहान येथील कॉग्रेसच्या जेष्ठ महिला शांताबाई अण्णासाहेब देशमुख लहानकर वय 80 वर्षे यांचे दि.24 नोव्हेंबर 2023 रोज शुक्रवारी दुपारी 4:00 वाजता दिर्घ आजाराने खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर दि.25 नोव्हेंबर 2023 रोज शनिवारी सकाळी 11:00 वाजता लहान येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कै.शांताबाई देशमुख यांचा धार्मिक व सामाजिक कार्यात मोठा सहभाग असायचा त्यांचे पश्चात- पती, दोन मुले, सुना, दोन मुली, जावई, नातु, असा मोठा परिवार आहे.
काँग्रेसचे जेष्ठ नेते अण्णासाहेब देशमुख लहानकर यांच्या पत्नी तसेच नांदेड कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे सभापती- संजय देशमुख लहानकर व लहान सोसायटीचे चेअरमन- सतिश देशमुख लहानकर यांच्या त्या मातोश्री होत.
*प्रतिष्ठा न्युज कडुन भावपुर्ण श्रद्धांजली…..💐🙏
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.