प्रतिष्ठा न्यूज

तासगाव कारखान्याकडून 3150 चा दर जाहीर : शेतकऱ्यांच्या हितासाठी खासदार संजय काकांकडून एफ आर पी पेक्षा जादा दर

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : या वर्षी असणारी दुष्काळी परिस्थिती व आता उद्भवलेल्या अवकाळीच्या संकटामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या अडचणीत आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत तासगाव कारखान्याच्या प्रशासनाने निहित एफआरपी पेक्षा जास्त 3150 रुपयांचा दर देण्याची जाहीर केले असल्याची माहिती कारखान्याचे सर्वेसर्वा खासदार संजय काका पाटील यांनी दिली येत्या दहा दिवसात संबंधित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल
यावेळी बोलताना खासदार संजय काका पाटील म्हणाले अत्यंत अडचणीच्या काळात तासगाव कारखाना आम्ही सुरू केला. प्रसंगी आर्थिक पदरमोड करून फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून आम्ही कारखाना सुरू केला अचूक काटा हे तासगाव कारखान्याचे वैशिष्ट्य आम्ही आजही कायम ठेवले आहे
यावर्षी शेतकरी आर्थिक दृष्ट्या दुष्काळी परिस्थितीमुळे पिचला आहे उसाचे टनेज कमी भरत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा तोटा झाला आहे त्यामुळे बाकी यांच्या पेक्षा एक पाऊल पुढे टाकत शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्याच्या दृष्टीने एफआरपी 3000 पेक्षा कमी असतानाही आम्ही एक रिकमी 3150 शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा दिवसात पेमेंट जमा होईल यापूर्वी ऊस दिलेल्या या पुढील देणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना हा दर लागू राहील असे ही ते म्हणाले यावर्षी चार लाख टना पेक्षा जास्त उसाचे गाळप करण्याचे कारखाना प्रशासनाची नियोजन आहे पुढील वर्षी आम्ही कारखान्याची गाळात क्षमता वाढवत आहोत जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना न्याय देता येईल.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.