प्रतिष्ठा न्यूज

‘चक्रवर्ती सम्राट अशोक’ पुस्तकाचे शुक्रवारी प्रकाशन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : मराठा सेवा संघ व इतर कक्षांतर्फे जिजाऊ जयंती सांगतेनिमित्त शुक्रवारी ( ता. १२) सायंकाळी साडेपाच वाजता थोर विचारवंत डॉ. सुभाष देसाई यांच्या ‘ चक्रवर्ती सम्राट अशोक’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अभियंता सचिन पवार अध्यक्षस्थांनी आहेत. कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील प्रमुख पाहुणे आहेत. कार्यक्रमांसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सेवा संघाचे अमृतराव सूर्यवंशी, डॉ. संजय पाटील, प्रणिती पवार यांनी केले आहे.

ते म्हणाले, मराठा सेवा संघ व इतर कक्षातर्फे ३ ते १२ जानेवारी दरम्यान ‘सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त व्याख्याने, आरोग्य शिबीर, वधु-वर मेळावा व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त शुक्रवारी पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते डॉ. सुभाष देसाई लिखित ‘चक्रवर्ती सम्राट अशोक’ ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. बहुजन समाजाला चक्रवर्ती अशोक कळलेले नाहीत. बहुजनांचे तारक असलेले महासम्राट अशोक यांचा परिचय या पुस्तकरुपाने लोकांसाठी उपलब्ध होणार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.