प्रतिष्ठा न्यूज

रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल बेडगमध्ये शाखास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : रयत शिक्षण संस्थेच्या, न्यू इंग्लिश स्कूल बेडगमध्ये, दिनांक- 9 /12/ 2022 वार शुक्रवार रोजी शैक्षणिक वर्ष 2022 -23 मधील शाखा स्तरीय विज्ञान प्रदर्शन यशस्वीपणे पार पडले, या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावी अखेर 80 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विविध विषयावरती उपकरणांची मांडणी केली होती, यामध्ये दैनंदिन जीवनातील विविध समस्या ,विज्ञानातील व गणितातील संकल्पना तसेच दळणवळण या विषयावरती नाविन्यपूर्ण अशी उपकरणे मांडली होती. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्रीनिवास पाटील सर यांच्या हस्ते झाले. विद्यालयाच्या विज्ञान विभाग प्रमुख सौ. उषा ढेबे, उपशिक्षक श्री. हणमंत म्हेत्रे , सौ.गीता म्हेत्रे, श्री. अनिकेत घस्ते, सौ. अश्विनी पाटील तसेच विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री. अशोक माळी, श्री. सुरेंद्र गायकवाड आणि विद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.