प्रतिष्ठा न्यूज

माजी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त शिक्षक सेनेच्यावतीने वृक्षारोपण पंधरावाडा साजरा होणार

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिव वृक्षारोपणाचा महोत्सव साजरा करण्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने ठरविले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना प्रांताध्यक्ष सन्माननिय श्री ज.मो. अभ्यंकर यांच्या संकल्पनेतून, आदेशाने व मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व विभागातील सर्व जिल्हे व तालुका स्तरावरील सर्व शिक्षक सैनिक या वृक्षारोपण अभियानात सहभागी होणार आहेत. सध्या ची दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पाऊस पडण्यासाठी आणि प्राणवायू मिळण्यासाठी,पर्यावरण संतुलित राहण्यासाठी वृक्षारोपण करणे नितांत आवश्यक आहे. दरवर्षी माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या जन्म दिवसा निमित्त,राज्य मराठवाड्यासह,नांदेड जिल्ह्यात हजारो वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येत मा.ऊद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस वृक्षारोपण पंधरावाडा म्हणून साजरा करण्यात येत आहे.हा वृक्ष लागवड उपक्रम गेल्या 3 वर्षापासून सातत्याने केला जात आहे.या अभियानाची सुरुवात आपणा सर्वांना दिनांक 13 ते 27 जुलै 2023 पासून वृक्षारोपण पंधरावाडा दिन साजरा होणार आहे. या उपक्रमात शिक्षक सेना बंधू आणि भगिनी यांनी सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन राज्य उपाध्यक्ष श्री विठुभाऊ चव्हाण, मराठवाडा सहसचिव, विठ्ठल देशटवार, श्रीरंग बिरादार जिल्हा अध्यक्ष श्री संतोष अंबुलगेकर,खाजगी सेना जिल्हा अध्यक्ष श्री तानाजी पवार, जिल्हा सरचिटणीस रविंद्र बंडेवार,भंडेवार, गंगाधर कदम, जिल्हा सरचिटणीस प्रा.परशुराम येसलवाड,गंगाधर ढवळे सर, अनिरुद्र शिरसाळकर, बळी शिंदे,मुस्तफा शेख,शिवाजी पाटील,प्रकाश कांबळे,राजू पवार,वसंत सिरसाठ यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.