प्रतिष्ठा न्यूज

काँग्रेसच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी भास्कर पाटील शिंदे यांची निवड

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
उमरा : नांदेड जिल्हा काँग्रेस पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी भास्कर पाटील शिंदे यांची काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री मा. अशोकराव चव्हाण व प्रदेशाध्यक्ष मा.नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली निवड करण्यात आली.

नांदेड येथील जिल्हा काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात माजी मंत्री.डि.पी.सावंत, आमदार मोहन आण्णा हंबर्डे, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष- गोविंदराव शिंदे नागेलीकर, उपमहापौर- सतीश देशमुख, प्रदेश सचिव- सुरेंद्र घोडजकर, विठ्ठल पावडे, लोहा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष- शरद पाटील पवार यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी गणेशराव घोरबांड, नागोराव मोरे, उतम वडवळे, किसनराव लोंढे, राम सोनसळे, सह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवडीबद्दल मा.भास्कर पाटील शिंदे यांचे उमरा सर्कल सह जिल्ह्यात अभिनंदन करण्यात येत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.