प्रतिष्ठा न्यूज

देशभक्ती निर्माण करणारी स्काऊट- गाईड चळवळ अधिक गतिमान व्हावी : शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड दि.29 : जिल्ह्यात स्काऊट- गाईड चळवळ अधिक गतिमान करावी. कारण या चळवळीमुळे विद्यार्थ्यांत राष्ट्रपेम, देशभक्ती, बंधूंभाव, समता निर्माण होत असते असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी तथा स्काऊट- गाईड आयुक्त श्रीमती डॉ सविता बिरगे यांनी केले. त्या भारत स्काऊट गाईड कार्यालयात ” उजळणी वर्ग ” कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, गेल्या 2 वर्षाच्या काळात स्काऊट गाईड चळवळीस कोव्हीड- 19 मुळे मरगळ आली आहे. तेव्हा शिक्षक बंधू भगिनींनी पुढे येऊन जास्तीत जास्त स्काऊट गाईड विद्यार्थ्यांची नोंदणी करून गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक ते प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते, माजी आमदार स्व. बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या प्रतिमेस स्काऊट संघटक श्री जनार्दन इरले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी जिल्हा स्काऊट संघटक श्री जनार्दन इरले हे नव्याने रुजू झाल्याने त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी स्काऊट ट्रेनर श्री कोंडावर सर, श्री फुलारी सर, श्री जाधव सर, श्री सिरसाट सर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त श्रीमती भागीरथी बच्चेवार,गाईड संघटक श्रीमती शिवकाशी तांडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी नांदेड, अर्धापूर, मुदखेड तालूक्यातील शेकडो शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित स्काऊटर, गाईडरचे आभार गाईड संघटक श्रीमती शिवकाशी तांडे यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.