प्रतिष्ठा न्यूज

सावळज येथील इच्छापूर्ती वधुवर सूचक विवाह संस्थेची उतुंग भरारी

प्रतिष्ठा न्यूज/ अनिल शिंदे
सावळज : अंजनी ता. तासगाव येथील श्री दत्तात्रय पाटील यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आठ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या तसेच 30 हजार सर्वधर्मीय सभासद असणाऱ्या तसेच आत्तापर्यंत 361 रेशीमगाठी गुंतणाऱ्या इच्छापूर्ती वधुवर सुचक विवाह संस्थेची स्थापना करून सावळज व परिसराच्या नाव लौकीकामध्ये मानाचा तुरा खोवला आहे, या विवाह संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत 361 विवाह सोहळे पार पडले आहेत.
या विवाह संस्थेच्या दमदार कामगिरीमध्ये आणखीन मोलाची भर पडली आहे ती म्हणजे 361 रेशीमगाठी गुंतणाऱ्या इच्छापूर्ती वधुवर सूचक विवाह संस्थेच्या नाशिक येथील शाखेचे नुकतेच दमदार उद्घाटन करण्यात आले.
श्री शांताराम सयाजी गांगुर्डे यांच्या शुभहस्ते सावळज येथील इच्छापूर्ती वधूवर केंद्राच्या नाशिक येथील शाखेचे उद्घाटन आज करण्यात आले, त्यानंतर सौ.मीना संदीप गांगुर्डे यांनी पूजा केली तर श्री.सुभाष नाईकवाडे यांनी श्रीफळ वाढवून इच्छापूर्तीच्या पुढील कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.
याप्रसंगी श्री. विजय पाटील डॉ.श्री.कैलास शेळके, डॉ.श्री. कांबळे साहेब,श्री. हजारे साहेब,श्री.महेश बोराडे श्री विलास गांगुर्डे श्री भाऊसाहेब गांगुर्डे तसेच महिला समाजसेविका सौ पूर्वा पवार मॅडम, सौ.शोभा जाधव मॅडम, सौ. ललिता गांगुर्डे, सौ सविता गांगुर्डे, सौ.लता बोराडे,सौ अनिता नाईकवाडे तसेच मोठ्या संख्येने मान्यवर मंडळी उपस्थित होते.
या वेळी सौ. मीना संदीप गांगुर्डे या अपंग भगिनीनी खाजगी नोकरी करून आपल्या कुटुंबास हातभार लावत त्या इच्छापूर्ती विवाह संस्थेच्या नाशिक शाखा समन्वयक म्हणून काम पहात आहेत.
इच्छापूर्ती वधुवर सूचक विवाह संस्थेच्या या दैदिप्यमान कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.