प्रतिष्ठा न्यूज

तासगावात उबाठा गटाकडून हिंदुरुदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार
तासगाव : येथील बागवान चौक येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) यांचे वतीने हिंदुरुदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करून आदरांजली वाहण्यात आली.* या वेळी तासगाव लोकसेवा भाजीपाला विक्रेता संघटना तासगांव यांच्या वतीने ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने घोषणा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना शहर प्रमूख मा.विशाल (भैया) शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींनी उजाळा दिल्या आणि आदरांजली भाषण केले सोबत इतर मान्यवरांनी ही मनोगत व्यक्त केली. यावेळी तासगांव शहरातील विविध मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. यावेळी शिवसेना तासगांव च्या वतीने *“टी शर्ट व सेंद्रिय गुळ” वाटप करण्यात आले सोबत नगरपालिका शाळा क्रमांक 2 येथे विद्यार्थ्यांना “केळी” वाटप ही करण्यात आली.* यावेळी सुशांत पैलवान (शहरप्रमूख युवासेना), जॉन भाई (शिवसेना अल्पसंख्यांक सेना तालुकाप्रमुख) , प्रमोद दादा सावंत (उपशहर प्रमुख ) प्रकाश कांबळे सर (सामाजिक कार्यकर्ते) , सुधीर रसाळ (शेट) तसेच लोकसेवा भाजीपाला विक्रेता संघटना अध्यक्ष सचिन माळी , उमेश पेटकर (शाखा प्रमुख) , तानाजी भाऊ पाटील, नारायण दादा पोतदार (शाखा प्रमुख), राहुल माने (सरचिटणीस), मयूर माळी (दोस्ती फौंडेशन), दिलीप कोळीगुडे, राजु साठे , शिवसेना महिला आघाडी शोभाताई पिसाळ, अश्विनीताई मोकळे , सुवर्णताई चव्हाण , लक्ष्मीताई पोतदार, छायाताई पाटील, मा.मिनाज भाभी तसेच भाजीपाला विक्रेते विष्णू लोटके , दत्तात्रेय चोपडे, महेश मानकर, विशाल गायकवाड, दीपक भोसले ,जगदीश खुजट ,शिदु चोपडे, सागर म्हेत्रे ,स्वप्नील भुजबळ, संतोष माळी, आशिष झिरमिले, उषाताई मुसळे, वानिता माळी, माधुरी माईणकर, पूनम लोटके, हजारे मावशी, वैशाली पवार व तासगांव शहरातील नागरिक, महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.