प्रतिष्ठा न्यूज

गॅस पाईप लाईन टेंडरवाले व मनपा पाणी विभाग यांच सूत काही जुळेना पाण्याची गळती काही थांबेना…

प्रतिष्ठा न्युज/ योगेश रोकडे
सांगली : विश्रामबाग परिसरातील विद्यानगर येथे सध्या गॅस पाईप लाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. हे काम नवीन तंत्र वापरून खड्डा न उकरता गॅस पाईप जमिनीखाली टाकत आहेत. हे काम करताना रस्त्याचे कमी नुकसान होते ही जमेची बाजू आहे. तर दुसऱ्या बाजूला या कामाच्या पद्धतीने पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईनची गळती होण्याचे प्रमाण वाढत आहे. ही गळती काढण्यासाठी पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी येत नाहीत. जबाबदार अधिकारी आमचा काहीही संबंध नाही असे सांगत आहेत. गॅस पाईप लाईन टेंडरवाले त्या गळतीची जबाबदारी घेतात पण ते कामगार गळती थांबवण्याच्या कामात सक्षम नसल्या कारणाने आठ आठ दिवस त्यांना लिकेज सापडत नाही. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे परिसरात मच्छरांची संख्या वाढली आहे. लिकेजसाठी काढलेल्या खड्ड्यात पाणी तुडुंब साठले आहे. त्यामुळे लहान मुलांना धोका निर्माण झाला आहे. तसेच यातून आरोग्याचा प्रश्न उद्भणार याला जबाबदार कोण ? नागरिकांना या सर्व गोष्टींचा त्रास होत आहे. नगरसेवकांना सांगितल्यास जबाबदार अधिकाऱ्यांना सांगतो असे उत्तर मिळते पण लिकेजची कामे होत नाहीत. शेवटी काय तर गॅस पाईप लाईन टेंडरवाले व मनपा पाणी विभाग यांच सूत काही जुळेना पाण्याची गळती काही थांबेना.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.