प्रतिष्ठा न्यूज

आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय काका अलर्ट मोडवर; तासगाव पालिकेत शहरातील विकास कामाबाबत आढावा बैठक

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव शहरातील वाहतूक कोंडीचा केवळ तासगाव शहरातील लोकांनाच नव्हे तर खानापूर,आटपाडी त्याचबरोबर सातारा,सोलापूर जिल्ह्यातून सांगलीकडे जाणाऱ्या लोकांना त्रास होत होता.बजेटमध्ये बायपाससाठी निधी मंजूर झाल्यामुळे शहरातील वाहतूक समस्या संपणार आहे या गोष्टीचे समाधान असल्याची भावना खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केली. तासगाव शहरातील शिक्षण, लाईट, पाणी, रस्ते, स्वच्छता, या नागरी समस्या बरोबरच शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी खासदार संजय काका पाटील यांनी तासगाव पालिकेत बैठक घेतली यावेळी ते बोलत होते.यावेळी मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, जाफर मुजावर,बाबासाहेब पाटील, किशोर गायकवाड उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार संजय काका पाटील म्हणाले जवळपास दीड वर्ष प्रशासक म्हणून मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील व त्यांच्या टीमने चांगले काम केले आहे,केंद्रात आणि राज्यात आपले सरकार आहे.तासगाव नगरपालिकेच्या कोणत्याही विकास कामासाठी निधी कमी पडून देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.बैठकीच्या सुरुवातीलाच पृथ्वीराज पाटील यांनी पालिकेच्या सुरू असलेल्या नियमित कामकाजाचा आढावा घेतला. त्याचबरोबर शहरातील सुरु असणाऱ्या केंद्र व राज्य सरकार मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती खासदार पाटील यांना दिली. यावेळी अभियंता अश्विन कोकणे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामाचा आढावा घेतला 275 घरकुले पूर्ण करून तासगाव नगरपालिका जिल्ह्यात आघाडीवर असल्याचे कोकणे यांनी सांगितले.यावेळी ज्या 61 लोकांचे काम रखडले आहे त्यांना भेटून त्यांच्या अडचणी दूर करून त्यांना शासकीय योजनेचा लाभ घेऊन द्या असे आदेश खासदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.यावेळी संदीप सावंत यांनी घरकुल अपूर्ण असणाऱ्यांना आणखी संधी देण्याची मागणी केली.यावेळी हनुमंत गायकवाड यांनी nulm च्या कामाची माहिती दिली.त्याचबरोबर बचत गटाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांची तसेच तासगाव पालिकेच्या बचत गटाला राज्य लेव्हलवर गौरवण्यात आल्याची माहिती पृथ्वीराज पाटील यांनी खासदारांना दिली.तासगाव शहरातील स्ट्रीट लाईटला मिळणारे एलईडी बल्ब कंपनीकडून मिळत नाहीत त्याचबरोबर शहरातील विस्तारित भागात लाईटचे पोल उभे करण्यासाठी निधी देण्याची मागणी राजू माळी यांनी केली,यावर सकारात्मक प्रतिसाद देत शासनाकडून यासंदर्भात निधी मंजूर करून आणण्याची ग्वाही खासदार पाटील यांनी दिली.राजू काळे यांनी तासगाव शहरला पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन विटा रोडवरील पाण्याची टाकी तयार झाली असल्याची माहिती दिली,त्याचबरोबर आणखी दोन टाक्या तीन महिन्यात तयार होत असल्याची माहिती सांगितली.यावेळी बाबासाहेब पाटील व संदीप सावंत यांनी शहरातील जुन्या झालेल्या पाईपलाईन बदलण्यासाठी शासनाकडून विशेष निधी आणण्याची गरज प्रतिपादित केली. त्याला संजय काकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.यावेळी किशोर गायकवाड यांनी पालिकेने केलेल्या वाहनांच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका शाळेसाठी स्कूलबस खरेदी करण्याची विनंती केली तर बाबासाहेब पाटील यांनी शहराबाहेरच्या विस्तारित भागात असणाऱ्या ओपन स्पेस मध्ये नवीन शाळा इमारती बांधण्याची गरज असल्याचे सांगितले.नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाबाबत खासदार पाटील यांनी समाधान व्यक्त केले, पालिकेचे मंगल कार्यालय नवीन प्रशासकीय इमारतीतले रिकामे गाळे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज संकुलातील गाळे यांना भाड्याने देण्यासंदर्भात पालिकेचे अभियंता आनंद बाबू आवताडे यांना खासदारांनी सूचना दिल्या.यावेळी बोलताना मुख्याधिकारी पाटील यांनी तासगाव नगरपालिके मार्फत घंटागाडीसाठी इलेक्ट्रिक व्हेईकल खरेदी केली असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर इथून पुढची होणारी वाहन खरेदी ही इलेक्ट्रिकच करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. स्वागत व प्रस्ताविक प्रताप घाडगे यांनी केले.

तासगाव शहरातील तब्बल सात कोटी रुपयांच्या विकास कामाचे उद्घाटन माझी वाट न बघता करून टाका, पावसाळ्यापूर्वी कामे संपवा मात्र कामाचा दर्जा हा चांगला असलाच पाहिजे असा सज्जड इशारा यावेळी खासदार पाटील ठेकेदारांना दिला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.