प्रतिष्ठा न्यूज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर जुनी पेन्शन मागणीचे उपोषण मागे

प्रतिष्ठा न्यूज / राजू पवार
नांदेड / मुंबई : 1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी दिनांक 3 मे रोजी पासून उपोषण सुरू केले होते .या उपोषणाचा आज उपोषणाचा 13 वा दिवस होता . मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या सोबत सह्याद्री अतिथीगृह येथे जूनी पेंशन साठी शिक्षक समन्वय संघटना पदाधिकारी, कर्मचारी यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे माजी आमदार दत्तात्रय सावंत माजी आमदार श्रीकांत देशपांडे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाचे समन्वयक सुनील भोर सचिन नलवडे ,समाधान घाडगे संजय वाळे, प्रसाद गायकवाड ,कल्याण बर्डे, आदीजण या बैठकीच्या ठिकाणी उपस्थित होते. मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे अभिवचन दिल्यामुळे तूर्तास उपोषण मागे घेण्यात आले आहे. बैठकीत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. अशी माहिती शिक्षक संघटना प्रमुख श्री सुनील भोर यांनी दिली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.