प्रतिष्ठा न्यूज

श्री दत्त देवस्थान मठ आडी येथे ग्रंथांचे प्रकाशन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : सद्ग्रंथांच्या वाचनाने भाविकांमध्ये अध्यात्ममार्गा विषयीची आवड अधिकच वाढते.ऐहिक व पारलौकिक – अशा दोन्ही प्रकारच्या हितासाठी सद्ग्रंथांचे वाचन करणे महत्त्वाचे आहे,असे विचार प.पू. परमात्मराज महाराजांनी तन्वास, सत्पोष व महोन्नय ग्रंथांच्या पुढील आवृत्तीचे प्रकाशन करताना व्यक्त केले.बुधवार दिनांक 12 जून 2024 ला या तीनही ग्रंथांचे सकाळी प्रकाशन झाले.त्यावेळी परमपूज्य परमात्मराज महाराज पुढे म्हणाले की “आपल्या परिसरातील भाविकांप्रमाणेच भरपूर लांब अंतरावरील भाविक सुद्धा सद्ग्रंथांचे वाचन करीत आहेत.सध्या भाविकांकरिता परमाब्धि,वर्तेट, रस्याव इत्यादी ग्रंथ उपलब्ध आहेत. परंतु काही दिवसांपासून तन्वास, सत्पोष व महोन्नय हे ग्रंथ उपलब्ध नव्हते.भाविकांची मागणी लक्षात घेऊन हे ग्रंथ पुन्हा छापून प्रकाशित केले आहेत.सत्पोष हा ग्रंथ चांगल्या बाबींचे पोषण करणारा ग्रंथ आहे. महोन्नय हा ग्रंथ अनिष्ट बाबींचे निर्मूलन करून सन्मार्गात उन्नती घडविणारा ग्रंथ आहे.तन्वास हा ग्रंथ संपूर्ण आयुष्याचा अत्यंत चांगला उपयोग करून घेऊन परम कल्याण साधण्या संबंधीचा ग्रंथ आहे.याप्रसंगी श्री देवीदास महाराज,श्रीधर महाराज,श्री के.डी.पाटील,श्री पी.आर.मोरे,मल्लेश बन्ने,रमेश कुलकर्णी,महेश खोत, ओंकार जाधव,शिवानंद खोत, साईनाथ पिंपळे इत्यादी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.