राजर्षी शाहू विद्यालयात भगवान बिरसा मुंडा आणि भारतरत्न इंदिरा गांधी यांची जयंती साजरी
प्रतिष्ठा न्यूज
नांदेड प्रतिनिधी दि.२० : राजर्षी शाहू विद्यालय ज्यु.काॅलेज येथे जननायक, थोर क्रांतिकारक बिरसा मुंडा आणि देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. श्रीमती इंदिरा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी शाळेत भगवान बिरसा मुंडा आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला मु.अ. श्री बालाजी हंगरगे आणि शाळेचे पर्यवेक्षक श्री सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी उपमुख्याध्यापक डॉ.पांडुरंग यमलवाड, क्रिडाशिक्षक श्री टी. एन.रामनबैनवाड, आनंद मोरे सर, प्रा. डॉ.टी.बी.जाधव, प्रा.आर.डी.देशमुख, प्रा.सुभाषराव तिवडे, मु.अ.बी.डी.देशमुख, अशोकराव गळेगावे, विठ्ठल पोकलेवाड, अमोल भंगाळे, किशन जायेभाये, पंढरी मुसळे श्रीमती खुळे मॅडम, श्रीमती जायेभाये, श्रीमती पावसे, श्रीमती गायकवाड, श्रीमती घोडेकरबाई,श्रीमती जाधवबाई, श्रीमती लक्ष्मीबाई वानोळे आदिजण उपस्थित होते.
दरम्यान कस्तूरबा गांधी विद्यालय, राजर्षी शाहू बालक मंदिर येथे सुद्धा भगवान बिरसा मुंडा आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी डॉ. माणिकराव गाडेकर यांनी आभार व्यक्त केले.