प्रतिष्ठा न्यूज

नांदेड येथे ग्रंथ दिंडी रॅलीचे उत्साही वातावरणात आयोजन

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड दि.20 : महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालय, नांदेड आणि निर्मल प्रकाशन यांच्या संयुक्त वतीने वाचन संस्कृती जोपासण्यासाठी दि.19 नोव्हें. रोजी ग्रंथ दिंडीचे आयोजन उत्साही वातावरणात संपन्न झाले.
आय.टी.आय. कार्नर येथे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास श्री निर्मलकुमार सुर्यवंशी आणि माजी आ.गंगाधर पटणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. ग्रंथ दिंडीचा प्रारंभ आय टि आय कार्नर ते शिवाजी नगर गोकुळ नगर मार्गे स्टेडियम पर्यंत करण्यात आले. या दिंडीत शहरातील विविध शाळा,महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी विद्यार्थ्यांनी यांनी सहभाग घेतला. तसेच एन. सी. सी. विद्यार्थी स्काऊट विद्यार्थ्यी, सामाजिक संघटना यांनी सहभाग घेतला. त्याचप्रमाणे सुजलेगाव ता.नायगाव येथील शाहीर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भजनी मंडळ सहभागी झाले होते.
याप्रसंगी माजी आ.गंगाधर पटणे,निर्मल प्रकाशन चे श्री निर्मलकुमार सुर्यवंशी, जिल्हा अध्यक्ष श्री तानाजी हुस्सेकर, उप शिक्षणाधिकारी श्री दिलीप बनसोडे, गटविकास अधिकारी श्री रूस्तुम आडे,शिक्षण विस्तार अधिकारी केशव मेकाले,डॉ.मणिक गाडेकर.श्री एस.जे.कदम, श्री पवार आदीजण उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.