प्रतिष्ठा न्यूज

गगनबावड्यात अवतरले स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेले क्रांतिकारक

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा येथील परशुराम विद्यालय व जुनिअर कॉलेजच्या उपक्रमशील शिक्षक व मुलानी भारताच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले. यामध्ये मुलानी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, लोकमान्य टिळक, रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाबाई, आनंदीबाई जोशी यांच्या वेशभूषा साकारल्या.
या भारतीय स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या महान क्रांतिकारक व समाज सुधारक यांची वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यांच्या महान कार्याचे स्मरण करून दिले.
मुख्याध्यापक रंगराव गोसावी, एस एस माळी, डी आर गिरीबुवा, एस ए सुतार, एस एस गवस, एस बी चौगुले, व्ही आय हरगापुरे, यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.