प्रतिष्ठा न्यूज

तासगांवचा आर आर पाटील स्पोर्ट्स क्लब ऑलिंपिक वीर खाशाबा जाधव राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने सन्मानित

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात तासगावच्या आर आर पाटील स्पोर्ट्स क्लबला खाशाबा जाधव राष्ट्रीय क्रीडा(क्रीडा गौरव) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.क्रिडा क्षेत्रात केलेल्या 2 वर्षातील उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू     अक्षदा ढेकळे,हिंदकेसरी दीनानाथ सिंग,यशवंत मानखेडकर उपसंचालक क्रीडा मंत्रालय भारत सरकार,भारत केसरी माऊली जमदाडे,आशियाई पदक विजेते प्रा अमोल साठे व विविध खेळातील आंतरराष्ट्रीय खेळाडू व मार्गदर्शक उपस्थित होते.संपूर्ण महाराष्ट्र मधून सांघिक क्रीडा गौरव पुरस्कार फक्त आर आर पाटील स्पोर्ट्स क्लबला मिळाला व पुरस्कार स्विकारने साठी क्लबने अनुष्का जगताप या महिला खेळाडूला हा मान दिला.यावेळी प्रमुख पाहुणे यांनी क्लबमार्फत चालू असलेले प्रशिक्षण तसेच खेळाडूचा मोफत विमा,मेडिकल खर्च लागणारे साहित्य (बॉल शूज.किट गरीब खेळाडूला मोफत दिले जातात) खेळाडूंचा सर्व शैक्षणिक खर्च,एवढ्या सुविधा कोणताही क्लब तालुका स्तरावर देत नाही ह्याचा उल्लेखही आवर्जून केला.   तसेच ज्यांच्या नावाने हा क्लब चालतो त्या आर आर आबांएवढे कर्तृत्व क्लबने करावे यावेळी या सुविधा ज्यांच्यामुळे दिल्या गेल्या त्या रोहित पाटील यांना ही शुभेच्छा दिल्या. यावेळी क्लबच्या खेळाडू व मार्गदर्शक यांचा ब्लेझर मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी क्लब चे उपाध्यक्ष व मार्गदर्शक अमित पवार सचिव,पवन जाधव संचालक,बाळासो सावंत,खंडू कदम व राष्ट्रीय क्रीडा भूषण प्रा अभिजित तासगावकर सर, खेळाडू अनुष्का जगताप,गायत्री माळी उपस्थित होते.या सर्वाना आमदार सुमन ताई पाटील,सुरेश भाऊ पाटील,रोहित पाटील,क्लबचे अध्यक्ष सुदाम माळी,संचालक प्रवीण माळी,परशुराम गुरव,रवी बाफना व राहुल पवार यांचे मार्गदर्शन लाभले. क्लबच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.