प्रतिष्ठा न्यूज

गगनबावड्यातील परशुराम विद्यालयाची यशाची परंपरा कायम ; गुणांनुक्रमे तालुक्यात पहिले चारही विद्यार्थी ‘परशुरामचे’ तर सात विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा येथील परशुराम विद्यालयाने यशाची परंपरा यंदाही कायम राखण्यात यश मिळवले आहे. बारावी बोर्ड परीक्षेत नऊपैकी सात विद्यार्थी विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झाले असून गुणांनुक्रमे तालुक्यातील पहिले चारही विद्यार्थी ‘परशुरामचे’ च आहेत. कु. अनिता वाघु गावडे हिने शेकडा ८५ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. तर कु. शितल गंगाराम गावडे हिने शेकडा ८१.३३ गुण मिळवत दुसरा क्रमांक, तर कु. प्रणाली प्रकाश हारुगले हिने शेकडा ८१.१७ गुण मिळवून तिसरा क्रमांक तर कु.संजना शामराव पाटील हिने ८०.३३ गुण मिळवून चौथा क्रमांक पटकावला. या विद्यालयाचे ४४ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी प्रथम वर्गात नऊ तर द्वितीय वर्गात १९ विद्यार्थी पास झाले.

“यंदा आमचा ९१% लागला. गेली पाच वर्षे आम्ही शंभर टक्के निकाल घेतला आहे. गतवर्षी विद्यार्थ्यांना ७०, ८० किंवा १०० गुणांचे परीक्षेसाठी अर्धा तास वाढीव दिला गेला होता. ती परीक्षा ७५ टक्के अभ्यासक्रमावर प्रत्यक्ष घेण्यात आली होती. यावर्षी शंभर टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्यात आली होती मात्र वाढीव वेळ दिला गेला नव्हता. यामुळे निकाल घसरला व कमी टक्केवारीवर समाधान मानावे लागले. मात्र सात विद्यार्थी विशेष प्राविण्यासह पास झाले असून तालुक्यातून गुणानुक्रमे प्रथम चार विद्यार्थी आमचे असल्याने समाधान आहे .”

– रंगराव गोसावी
प्राचार्य, परशुराम विद्यालय, गगनबावडा

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.