प्रतिष्ठा न्यूज

चिंचोली येथे १२ लक्ष रुपयांच्या विकास कामाचे आ. श्यामसुंदर पाटील शिंदे व आशाताई शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : कंधार तालुक्यातील चिंचोली येथे आ. श्यामसुंदर पाटील शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या समोर पेव्हर ब्लॉक करणे 5 लाख रुपयांच्या कामाचे व 7 लक्ष रुपयांच्या सभामंडप कामाचे भूमिपूजन आ. श्यामसुंदर पाटील शिंदे व शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा आशाताई शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले व गावकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या यावेळी कार्यक्रमाप्रसंगी बोलताना आ. श्यामसुंदर पाटील शिंदे  म्हणाले की, विविध विकास कामांचा लेखाजोखा स्पष्ट केला व लोहा कंधार मतदार संघातील रस्ते, वीज, दळणवळण, सिंचन व इतर सर्व विकास कामांसाठी सदैव कटिबध्द आहे व सभामंडप साठी आणखीही निधी लागला तर निश्चितच देईन असे आश्वासन यावेळी दिले.
या प्रसंगी बोलताना आशाताई म्हणाल्या की,आ. शिंदे साहेबांच्या माध्यमातून लोहा कंधार मतदारसंघातील कोणत्याच गावांना विकास निधी कमी पडू देणार नाही कालच तुम्ही वर्तमानपत्रात बगीतले असेल आ. शिंदे साहेब निधी वाटपात जिल्ह्यात 2 नंबर आहेत. जिल्ह्यात सर्वात जास्त कामे आपल्या मतदारसंघात कामे चालू आहेत असे यावेळी आशाताई म्हणाल्या याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंदराव कौसल्ये, जिल्हाध्यक्ष बालाजी इसादकर, प्रदीप पाटील नंदनवनकर, चौकी महाकाय सरपंच हनुमंत पाटील कदम, ओमराजे शिंदे, माजी सरपंच राष्ट्रपाल चावरे, प्राचार्य निवृत्ती पाटील कौसल्ये, सुधाकर कौशल्ये, व्यंकटराव कौशल्ये, हनुमंतराव  कौशल्ये, माजी सैनिक सुभाषराव कौसल्ये, ओम ठाकूर, महेश पिनाटे, बाळू मंगनाळे, माजी सरपंच हौसाजी वाघमारे, गिरीश डिगोळे, गंगाधर चिखलीकर, मारुती मेकलवाड, नामदेव तेलंगे कार्यक्रमाचे आयोजक विशाल कौसल्ये सह कार्यकर्ते, गावकरी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.