प्रतिष्ठा न्यूज

बलिदान मास पाळणे प्रत्येक हिंदूंचे कर्तव्य : सुनील (बापू ) लाड

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : प्रतिवर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली धारातीर्थ यात्रा (गडकोट मोहिमेचे)आयोजन करण्यात येते.या वर्षी संपन्न झालेल्या मोहिमेचा महाप्रसाद व फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून प्रारंभ होणाऱ्या धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास या विषयी मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन तासगावच्या चंपाबेन हायस्कूलच्या मैदानावर करण्यात आले होते.यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सुनिल बापू लाड यांनी सर्व हिंदू बांधवाना मार्गदर्शन केले.याप्रसंगी त्यांनी प्रतिष्ठानच्या मोहिमेच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या लोकांच्या जीवनात झालेले अमुलाग्र बदल याबाबत कथन केले.तसेच आपण सर्वच शिवरायांच्या आशीर्वादाने फक्त सह्याद्रीची मोहिम करु शकतो आणि ती करावी फक्त धारकरी मावळ्यांनीच असे प्रतिपादन केले.प्रतिवर्षी फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन वद्य अमावस्येपर्यंत संभाजी महाराज यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण म्हणुन धर्मवीर बलिदान मास पाळला जातो.त्यांनी धर्मासाठी सोसलेल्या हाल अपेक्षा आणि केलेलं बलिदान व त्यांची न निघालेली अंत्ययात्रा ही अमावस्येला मुक पदयात्रा काढून काढण्यात येते. यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक गावाच्या ठिकाणी धर्मवीर बलिदान मास पाळला गेला पाहिजे.आज आपण हिंदू म्हणुन आज जगतो आहोत याच स्मरण म्हणुन प्रत्येक हिंदू बांधवांने महिनाभर एकवेळच्या जेवणाचे अन्नत्याग करणे,डोक्याचे मुंडण करणे,त्यांचे स्मरण म्हणुन आपल्या आवडत्या गोष्टीचा एक महिना त्याग करणे,गादीवर न झोपणे आणि संभाजी महाराजांना प्रतिदिन श्रद्धांजली अर्पण करणे हे प्रत्येक हिंदु बांधवानी महिनाभर केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तासगांव तालुक्यातील सर्व धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.